तुम्ही अशा व्यक्तीला काय म्हणाल ज्याने कॉलेजचा फक्त एकच दिवस अटेंड केला असेल? ज्याने कॉलेजची पायरी फक्त एकदाच चढली असेल? ज्याने ऍकॅडमीक शिक्षणच पुर्ण केले नसेल? अशा विद्यार्थ्याला सर्वच ड्रॉप आऊट म्हणून संबोधतील. पण आपल्याला हे ऐकून आर्श्चय होईल की, याच ड्रॉप आऊट विद्यार्थ्याने भारतासाठी पहिला नोबेल पुरस्कार पटकविण्याची किमया केली. त्यांनी भारतासाठी राष्ट्रगीत लिहले. त्यांचे नाव आहे रविंद्रनाथ टागोर. नुकताच त्यांचा स्मृतीदिन साजरा झाला. त्यानिमित्त स्त्री शोषणावर त्यांनी केलेले भाष्य या लेखप्रपंचेतून मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
लिटरेचरमधून नोबेल पुरस्कार प्राप्त भारताचे ज्येष्ठ साहित्यिक रविंद्रनाथ टगोर यांनी लिहलेली कविता आज भारताचे राष्ट्रगीत म्हणून ओळखले जाते. एवढेच नव्हे तर बाग्लादेशानेही त्यांनी रचलेली कविता राष्ट्रगीत म्हणून स्विकार केली आहे. त्यांनी भारताला मोलाचा साहित्यिक खजाना दिला आहे. त्यांच्या साहित्यावर आधारित आज बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट झाले आहे. त्यांनी लिहलेली पात्रही तितकीच रोचक ठरली आहेत. ‘चारुशीला’ एक अशी विवाहित स्त्री जी स्वतःला नेहमी एकटी समजत असे. तिचे पती भुपती एक वृत्तपत्र चालविणारे व्यवसायिक. भुपती चारुच्या मनात चाललेली घालमेल ओळखतो आणि आपल्या पत्नीचा एकटेपणा दुर व्हावा, यासाठी आपला चुलत भाऊ आलमला तिच्यासोबत राहावयास सांगतो आणि कहानीत ट्विस्ट येतो. येथे आलमचे आणि चारुचे सुत जुळायला सुरुवात होते, आणि सर्व कथा बहरते. जर ही कथा आजच्या काळात रचली गेली असती तर काही वाटले नसते. कारण अशा धर्तीवर बॉलीवूडमध्ये चित्रपट येऊन गेले आहेत. किंबहूना हे चित्रपट रविंद्रनाथ टागोर यांच्याच कांदबरींवर आधारीत असावेत. परंतु, तत्कानील वेळी अशी कथा लिहणे हे फार धाडसाचे पाऊल होते. या कथेचा काळखंड १८७० चा आहे आणि त्यावेळची सामाजिक परिस्थिती आजच्या परिस्थितीपेक्षा फार भिन्न होती.
रविंद्रनाथ टगोरांचा जन्म हा स्वातंत्र्यपूर्व काळात ७ मे १८६१ साली बंगला प्रांतातील कोलकत्ता या शहरात झाला. त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत अमुलाग्र बदल झाले आहेत. आजच्या सारखे स्वातंत्र्य तेव्हा नव्हते. अर्थात राजकिय स्वातंत्र्यासह सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यावरही निर्बंध होते. १८७० मध्ये सामाजिक स्वातंत्र्य नव्हते. वर्णव्यवस्थेने ते नाकारले होते. ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य, शुद्र आणि अतिशुद्र अशा वर्णांमध्ये जाती विभागल्या होत्या आणि त्यात स्त्रीयांना मग ती कोणत्याही वर्णाची असो, तिला स्वातंत्र्य नव्हतेच. शिक्षणाचा अधिकार नव्हता. आपले मत प्रकट करण्याची मुभा नव्हती. अशावेळी स्त्रीयांनाही स्वतंत्र अस्तित्व आहे, याची जाणीव करुन देणार्या कथा त्यांनी रचल्या.
एकटेपणाने व्याकूळ झालेली आणि प्रेम शोधणारी ‘चारुशीला’, लग्नानंतर विधवा झालेली ‘चोखेर बाली’, ऐन यौवनात मुक्त बागडणारी ‘गोरा’ अशा स्त्रियांच्या मध्यवर्ती भुमिका असणार्या कांदबर्या रचून रविंद्रनाथ टागोर यांनी तत्कालीन रुढीपंरपरेवर आघात केला. त्यावेळी कदाचित त्यांनी रचलेल्या कांदबर्यांविरोधात तत्कालीन समाजाची घडी आहे तशीच राहू दे, अशा विचारसरणीच्या लोकांनी विरोध केला असावा. परंतु, टागोर या विरोधाला न जुमानता समाजातील स्त्री जीवनावर भाष्य करीतच राहिले.
‘चोखेर बाली’ने अशा स्त्रीचे प्रतिनिधीत्व केले होते, ज्या विधवा होत्या. १९०० च्या दरम्यान रचलेली ही कांदबरी. त्यावेळी विधवांना पुर्नंविवाहाची बंदी होती. तपूर्वी राजा राम मोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे लॉर्ड कझिनने भारतात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीने सती जाण्याची प्रथा कायदेशीररित्या बंद केली होती. विधवांना सती जाणे म्हणजे एकप्रकारे तिची हत्याच होय. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यात आली; तरीही भारतात सती प्रथा ९५ टक्के सुरुच होती. कायदेशीररित्या सतीची चाल बंद जरी झाली असली तरी विधवांची दयनीय अवस्था ‘जैसे थे’ अवस्थेत होती. मुख्यत्वे कोलकत्यात सती प्रथा अधिक प्रमाणात रुढ झालेली म्हणून कायदेशीर मार्गान या अनिष्ट प्रथेला पूर्णविराम लावला असला तरी रुढीवाद्यांच्या मनात ही प्रथा कायमच होती. परंतु, कायद्याच्या धाकामुळे काहीजण ‘सती’ नको रे बाबा...! असे म्हणत. मात्र केशमुंडण, पुर्नंविवाह बंदी आणि इतर जाचक अटी तिच्यावर लादल्या जात होत्या. या प्रथेविरोधात रविंद्रनाथ टागोर यांची चोखेर बाली प्रहार करते. लग्नापूर्वी सर्व सुरुळीत असताना पती गेल्याचे दुःख कुठे पचविलेच होते; तर तिच्यावर अमानुष अत्याचार सुरु होतात. सुरुवातीला साधुसुधी भासणारी आपल्या या अन्यायाचा बदला घेण्यासाठी सज्ज होते. या परिस्थितीला जबाबदार लोकांवर सुड उगवायचा, या विचाराने पेटून उठते. अशी या चोखेर बालीची कथा. अर्थात तिचा सुड हा कोण्या एका व्यक्तीविरोधात नसून या समाजव्यवस्थेवर होतो आणि आहे. कारण आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. समाजातील विधवांकडे आजही उपेक्षित घटक म्हणूनच पाहिले जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, समतावादी लोकशाहीचा स्विकार केल्यानंतरही चोखेर बाली आजही कुठेतरी जिवंत आहे. अर्थात अशी परिस्थिती सगळीकडे जरी नसली तरी वास्तव आपण बदलू शकत नाही. जरी आजची स्त्री स्वतःला स्वतंत्र समजत असेल, तरीही ती मानसिक गुलामच आहे. हे तिच्या अलंकारावरुन दिसून येते. सातारा भागात एक म्हण प्रचलित आहे. किंबहुन ही म्हण इतर ठिकाणीही बोलली जात असावी. ‘बाईला चारी ठिकाणाहून बांधली असूनही आगाव आहे’, याचा अर्थ असा की, गळ्यात मंगळसुत्र, हातात बांगड्या, पायात पैजण आणि बोटामध्ये जोडवी. हे सर्व दागिणे आजच्या स्त्रीला अलंकार भासत असतील, मात्र हे दागिने नसून स्त्री गुलामगिरीची निशानी आहे.

No comments:
Post a Comment