आजच्या दिवशी १९४७ रोजी अर्थात १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण या स्वातंत्र्यानंतर काय मिळाले, तर फाळणी. आज भारतातील कानाकोपर्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना स्वातंत्र्यामुळे झालेल्या फाळणीचाही विचार करावयास वाटतो. स्वातंत्र्यानंतर झालेल्या फाळणीमुळे लाखोंच्या संख्येने लोक बेघर झाली. महिनोंमहिने स्थलांतर सुरुच होते. काही भुकबळीने गेले तर कित्येकांच्या हिंदू-मुस्लीम दंगलीत मारले गेले. मोहनदास करमचंद गांधी, बॅ. जीना आणि इतर नेत्यांमध्ये झालेल्या खलबतीचा परिणाम म्हणजे फाळणी.
सम्राट अशोकाच्या काळात एकसंघ असलेला अखंड भारत सम्राट अशोकाच्या तिसर्या पिढीनंतर विखुरला. त्यानंतरच्या काळात छोट्या-मोठ्या राष्ट्रांमध्ये विभागलेल्या भारताला पुन्हा जलाल अकबरने एकसंघ केले. अकबरची आताच्या पाकिस्तानापासून ते दिल्लीपर्यंत सत्ता होती. भारताची राजधानी दिल्लीचा तख्त कोणत्याही राजाला जिंकता आला नाही, तो फक्त ब्रिटीशांनी काबीज केला आणि भारतात विभाजनाची बीजे रोवण्यास सुरुवात झाली. याच अर्थ असा होत नाही की, भारतात समानता होती. बौध्द धर्माच्या र्हासानंतर भारताला असमानतेने पोसले होते. त्यामुळे परकियांना राज्य प्रस्तापित करण्यात सुकर झाले.
* भारतावर ब्रिटीशांची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर सुमारे १०० वर्षांनंतर म्हणजे १९०० भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली. लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीत १९०५ मध्ये बंगालची फाळणी झाली. त्यानुसार पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगालची निर्मिती झाली. खरेतर ही फाळणी भारतीयांना मान्यच नव्हती. बंगालच्या फाळणीला बाळ गंगाधर टिळक, लाल बहादुर शास्त्री आणि लाला लाजपत राय यांचा विरोध कायम होता. इग्लंड येथे १९३३ साली झालेल्या गोलमेज परिषदेत मुस्लीम नेत्यांनी स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी केली.
* ऍड. रेहमत अली यांनी पाकिस्तान आणि हिंदूस्तान अशी दोन राष्ट्रे झाली पाहिजेत, अशी मागणी केली. राज्यसंघ स्थापन करण्यासाठी ब्रिटीशांनी गर्व्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९३५ संमत केला. या कायद्यान्वये मुस्लीम लीगने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राच्या मागणीचा जोर धरला.
*स्वतंत्र राष्ट्रासाठी ऑल इंडिया मुस्लीम लीगची २७ ऑगस्ट, १७ आणि १८ सप्टेंेबर, २२ ऑक्टोबर १९३९ मध्ये बैठक पार पडली. यामध्ये मुस्लीम लीगने स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राची मागणी जोर लावून धरली. फेबु्रवारी १९४० मध्ये झालेल्या परिषदेतही मुस्लीम लीग स्वतंत्र मुस्लीम राष्ट्रासाठी ठाम राहिली.
* हिंदू महासभेचा दोन राष्ट्र असावीत, याला विरोध होता; तर मुस्लीम लीग दोन स्वतंत्र राष्ट्रांसह मुस्लीम स्टेटच्या मागणीसाठी ठाम होता. बॅरिस्टर जीना पाकिस्तानलही स्वतंत्र मिळावे, तेही भारताच्या अगोदर यासाठी प्रयत्नशील होते.
* ऍड. रेहमत अली, सर मोहम्मद इकबाल यांनी दोन राष्ट्रांच्या सीमा तयार केल्या. त्यांच्या सीमांकनानुसार बलुचिस्थान, मुस्लीम बहुल पंजाबचा काही भाग, बंगालचा काही भाग अशा स्वरुपात पाकिस्तान आणि इतर पाच इस्लामीक स्टेटची आखली केली.
* दरम्यान, मोहनदास करमचंद गांधी कॉंग्रेसमध्ये येण्यापूर्वी भारतात दोन संघटना होत्या. एक म्हणजे लिबरल पार्टी आणि दुसरा गट क्रांतीकारकांचा. या दोन्ही संघटनामध्ये सामील असीम राष्ट्रप्रेम आणि बलीदान देण्याची अट होती. लिबरल पार्टी विद्वानांचा भरणा होता. ते शासकीय पध्दतीने स्वातंत्र्यासाठी झटत होते. तर क्रांतीकारी लढा देऊन स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रयत्नात होते.
* अशावेळी गांधी कॉंग्रेसमध्ये आली आणि त्यांनी लढ्याची दिशा बदलली. प्रांतवार आणि भाषावर पध्दतीने कॉंग्रेसची मुख्यालये स्थापन केली.
* भारताची फाळणीचा आधारही प्रांत, धर्म आणि भाषा होता. त्यामुळे मुस्लीम बहुल लोकसख्या असलेला प्रांत वेगळा करण्याची मागणी मुस्लीम लीगने लावून धरली. सरतेशेवटी देशाची फाळणी झाली.
* या फाळणीचे परिणाम आजही दोन्ही राष्ट्रांना भोगावे लागत आहे.

No comments:
Post a Comment