आम्हीही दहशतवादाचे बळी ठरत आहोत, अशी उसणी आरोळी ठोकणारा पाकिस्तान मात्र दहशतवाद संपविण्याच्या मुद्यापासून फारकत घेताना दिसत आहे. किंबहुना दहशतवाद हे पाकचेच पिल्लू असल्यामुळे स्वतःच्या लेकराला मारायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला असावा. गेल्या दोन दिवसांपासून न झालेली भारत-पाक चर्चा चांगलीच गाजली. या चर्चेचा विषय होता दहशतवाद. मात्र आडमुठी भूमिका घेतलेल्या पाकला हा विषयच नको होता, म्हणून त्यांनी काल २२ ऑगस्टला होण्यार्या संवादाचा विसंवाद करुन टाकला.
भारत-पाकमधील होणारी चर्चा पाकिस्तानकडून रद्द करण्यात आली. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही चर्चा तीन टप्प्यात होणार होती आणि चर्चेचा दहशतवाद हा एकच अजेंड होता. दोन देशांमध्ये एखादी चर्चा होत असेल तर त्याचे विषय, आशय हे अगोदरच ठरलेले असतात आणि या चर्चाचाही विषय ठरला होता. मग ऐनवेळी पाकिस्तानने हेकेकोरी करण्याचे कारणच ते काय? फुटीरवादी हुर्रियत नेत्यांचा हस्तक्षेप आणि कश्मीर मुद्द्यावर पण चर्चा व्हायला हवी, अशी पाकिस्तानची मागणी होती. तर भारताने आधी ठरविल्यानुसार चर्चा होईल, असे ठणकावले होते. जे व्हायचे ते झाले. चर्चा काही झाली नाही. कारण पाकिस्तानला ही चर्चा नकोच होती. फक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा बिघडू नये, म्हणून त्यांनी या चर्चेला सकारात्मकता दाखविली होती. आता मुळ मुद्दा हा की, खरचं पाकिस्तानला चर्चा हवी होती का? जर दहशतवादासोबतच कश्मीर प्रश्नावरही चर्चा झाली असती तर काय बिघडले असते? असे जर घडले असते तर कदाचित मुळ मुद्दा दहशतवाद बाजुलाच राहिला असता. म्हणून भारताची भूमिका ही योग्य होती आणि आहे.
‘उफा’ करारानुसार पाकिस्तान दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्यासाठी चर्चा करण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले होते. पण जर या विषयावर चर्चा झाली असती तर पाकच तोंडघशी पडला असता. म्हणूनच ही चर्चा नाकारण्यात आली असावी. यासाठी पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. गेल्या काही दिवसांपूूर्वी पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर नावेद या अतिरेक्याला जीवंत पकडण्यात आले आहे. या दोन्हीही घटनांमध्ये पाकिस्तानचा सक्रिय सहभाग होता, याचे ठोस पुरावे भारताच्या गुप्तचर यंत्रणेकडे आहेत. तर हिंदूस्थान टाईम्सने प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार दाऊद पाकिस्तानमधील कराचीतच लपून बसला आहे. हे सर्व पुरावे भारताच्या ‘रॉं’कडे आहेत. हे सगळे इतक्यात घडले, याला काही आपण कर्मधर्मसंयोग म्हणता येणार नाही. दहशतवादी हल्ले हे पूर्वनियोजित असतात, त्याचप्रमाणे दाऊदचा पत्ता सापडणे ही देखील गुप्तचर यंत्रणेची एक खेळी होती. चर्चेसाठी ठरलेल्या एक दिवस अगोदर दाऊदचा पत्ता होती पुराव्यासह आणि फोटोसह भारताकडे होता. मग जर चर्चा झाली असती, तर हे पुरावे भारताने पकिस्तानसमोर नक्कीच ठेवले असते आणि मोस्ट वॉंटेड डॉन दाऊदच्या हस्तांतरणाची पहिली मागणी केली असती. त्यानंतर दहशवादी नावेद, पंजाब हल्ल्यातील सापडेलेले पुरावे, २६/११ दहतशवादी हल्ल्यातील भारताकडे पाकविरुध्द असलेले पुरावे. असे एक ना अनेक पुरावे भारताने पाकिस्तानसमोर पत्त्यांसारखे टाकले असते. तेव्हा मात्र पाकिस्तानची कोंडी झाली असती. या सर्वांतून पळ काढण्यासाठीच पाकिस्तानने चर्चेला तिलांजली देण्याचा मार्ग पत्कारला. पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे जगाला पाकचा खरा चेहरा नक्कीच दिसला असेल. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दहशवाद्यांना पोसायचे आणि ‘मी नाही त्यातली कडी लाव आतली’ असे बरळत राहायचे.

No comments:
Post a Comment