Tuesday 25 August 2020

James Prinsep आणि ब्राम्ही लिपी

 

ब्राम्हीआणि जेम्स प्रिन्सेप

भारताला समृद्ध इतिहास लाभलेला आहे आणि हा इतिहासाचा ठेवा पालि भाषेमध्ये जनत आहे. पालि साहित्यामध्ये भारताचा सुवर्णकाळ अंकित आहे आणि या भाषेची नोंद ब्राम्हीमध्ये सम्राट अशोकामुळे आज आपल्याला ऐतिहासिक पुराव्यांच्या स्वरूपात पहावयास मिळते. पालि भाषा म्हणजे बौद्ध साहित्य असा स्पष्ट अर्थ असल्यामुळे काही संशोधकांनी ब्राम्ही लिपीलाधम्मलिपीसंबोधले. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्येही धम्मलिपी असा उल्लेख आहे. गिरीणारच्या लेखांमध्ये तसा उल्ल्ेख सापडतो. ब्राम्हीतील बहुतांशी लेख बौद्ध धम्मासंबंधी माहिती देणारे असल्यामुळे त्यालाधम्मलिपीसंबोधले. असे असले तरी सम्राट अशोकाने कोरलेले शिलालेख हे ब्राम्ही लिपीमध्ये आहेत, याबाबत बहुतांशी अभ्यासकांचे एकमत आहे. 

ब्राम्ही लिपीचे वाचन पुरातन वास्तु अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांनी केले. उत्खननातून जेव्हा काही वेडीवाकडी वळणे असणारी अक्षरे दिसली, तेव्हा यामध्ये काय लिहले आहे, ते त्यांना उमगले नाही. तो काळ होता अठराशे शतकातला. अठराशे शतकात ब्रिटिशांनी भारतात पाय रोवले होते. एकीकडे सत्ता गाजवत असताना दुसरीकडे भारतातील प्राचीन संस्कृतीचा शोधही सुरू होता. उत्खननातून प्राचीन संस्कृती उदयास येत होती. त्याचबरोबर बौद्धकलीन इतिहासही जो मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला होता, तो बाहेर येत होता. चिनी प्रवासी ह्युएनस्तांग याच्या डायरीच्या आधारे स्तुप, लेणी, स्तंभ यांचा शोध घेण्यात आला. त्यावेळी शिलालेख आढळले. पुरातन नाणी सापडली. यावर ब्राम्हीमध्ये काही लेख होते. परंतु, अठरावे शतक येईपर्यंत ब्राम्ही कोणालाही वाचता येत नव्हती, त्यामुळे हे काय लिहले आहे, याचे वाचन करणे एक आव्हानात्मक होते. हे आव्हान जेम्स प्रिन्सेप यांनी पेलले. जेम्स प्रिन्सेप यांचा जन्म १७९९ मधला. १८२० च्या दरम्यान ब्रिटिशांनी त्यांची नेमणूक कोलकत्ता येथील टकसाळवर केली होती. पुरातत्व वास्तु अभ्यासक असल्याने दुसरीकडे त्यांचा पुरातत्व अभ्यासही सुरू होता. भारतावर इन्डो ग्रीक राजांचे वर्चस्व राहिले आहे. कनिष्क, कुशान हे इन्डो ग्रीक राजांची उदाहरणे आहेत. इन्डो ग्रीक राजांनी काढलेली नाणी द्विलिपीक होती. अर्थात दोन लिपींमध्ये त्यावर काहीतरी लिहलेले होते. ब्रिटिशांना ग्रीक लिपी अवगत असल्यामुळे त्याचे वाचन शक्य झाले. परंतु, ब्राम्हीमध्ये काय लिहले आहे, हे उमजत नव्हते. जवळपास सात वर्षांनंतर त्यांना ब्राम्हीची अक्षरे वाचता आली.

सांची स्तुपावरील वेदिकेवर लिहलेल्या लेखापैकी त्यांनीआणिहे दोन अक्षरे सर्वप्रथम वाचली. सतत सात वर्षे रोज सकाळी ते ब्राम्ही वाचण्याचा प्रयत्न करायचे. बहुतांशी लेखांमध्ये त्यांना शेवटची दोन अक्षरे सारखी असल्याचे जाणवले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, शेवटची अक्षरेदानदेणाऱ्यांसदर्भात आहेत. त्यांनी सर्वप्रथमनंहा अनुस्वार शोधला. नंतरआणिवाचला. असेच एकएक करत सर्व अक्षरांचा शोध लावला आणि दिल्लीतील ब्राम्ही लिपीचा शिलालेख वाचून काढला. ब्राम्ही वाचन करत असतानादेवानंपिय पियदस्सि लाजाअसा उल्लेख आढळतो. येथेलाजाम्हणजेराजाहोय. पण ब्राम्हीच्या लेखामध्येराजाशब्दप्रयोगासाठीऐवजीचा प्रयोग झाल्याचे दिसून येते. इतर ठिकाणी मात्र असे शब्दप्रयोग दिसत नाहीत. ही लेख कोरणारा लेखापाल याची चूक की तेव्हा तसे प्रचलित होते, हे सांगणे कठिण आहे. जेम्स प्रिन्सेप यांनी केवळ ब्राम्हीचेच वाचन नाही केल तर त्यांना तत्कालीन खरोष्ठी लिपीचेही ज्ञान होते. सम्राट अशोकाच्या काळात दोन लिपी मुख्यत्वे प्रचलित होत्या. खरोष्ठी जी ऊर्दूप्रमाणे उजवीकडून डावीकडे लिहली जाते, ब्राम्ही जी देवनागरीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहली जाते. सम्राट अशोकाने सांची भाऱ्हुटमध्ये स्तुप बांधली आणि या स्तुपांवरील वाचन जेम्स प्रिन्सेप यांनी केले.  

ब्राम्हीचा भारतातील इतर लिपींवर प्रभाव असल्यामुळेच त्यांना हे वाचन शक्य झाले. आज मोहेजदाडो- हडप्पा संस्कृतीमध्येही काही लेख सापडले आहेत. परंतु, त्याचे वाचन मात्र अद्याप कोणाला जमलेले नाही. मोहेंजदाडो-हडप्पा संस्कृती ही पाच हजार वर्षांपूर्वीची असून एकेकाळी येथे सर्वकाही सुजलाम-सुफलाम होते, हे उत्खनानातून सिद्ध झाले आहे. येथे काही लिपीसदृश्य आकृत्या सापडल्या आहेत. पण त्यांचे वाचन होऊ शकले नाही. गौतम बुद्धांचा काळखंड हा इसवी सन पूर्व पाचवे शतक आणि त्यानंतर दोनशे वर्षांनंतर सम्राट अशोकाचा काळखंड. अर्थात इसवी सन पूर्व तिसरे शतक. या काळात ब्राम्हीमध्ये लिहलेले लेख अठराशे शतकात वाचने म्हणजे एक कठीणच काम होते. पण ब्राम्ही लिपीचा इतर लिपींवर प्रभाव असल्न्यामुळे ब्राम्ही लिपीचे वाचन शक्य होऊ शकले. ‘एशियाटीक सोसायटी ऑफ बंगालसाठी लिहलेलेजरनलमध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी ब्राम्ही लिपीची स्थितांतरे यांचा उल्लेख केला आहे.

जेम्नस प्रिन्सेप यांनीदेवानपिय पियदस्सिअसे वाचन केल्यानंतर हा कोणी श्रीलंकेचा राजा असावा, असे गृहित धरले. कारण सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेतहीदेवानपियतिस्सनावाचा राजा होता. सम्राट अशोक आणि देवानपियतिस्स यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते, हे बौद्ध साहित्यातील सासनवंस ग्रंथावरून दिसून येते. पण नंतर देवानंपिय पियदस्सि हा दुसरा कोणी नसून सम्राट अशोकच आहे, हे देखील सिद्ध झाले. आपल्याकडे इतिहास जतन करण्याची प्रथा कधीच राहिली नाही. पण इतिहासाची नोंद ठेवण्याची सुरूवात सम्राट अशोकाने केली. त्यांनी कोरलेल्या शिलालेखांमुळे जेम्स प्रिन्सेप यांना इतिहासाचा वेध घेणे शक्य झाले. त्यांनी अनेक उत्खननांतून बुद्धधातू अर्थात अस्थि ज्या कलशामध्ये संरक्षित होत्या, त्या बाहेर काढल्या. कलशावरील लेखामुळे या अस्थि बुद्धांच्या आहेत, हे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे त्यांना याचे वाचन करता येत असल्यामुळे त्याचा शोध घेणे जास्त सोपे होत गेले.