भारत हा कलाप्रेमींचा देश आहे. या देशात अनेक अजरामर कलाकृतींचा उदय झाला आहे. हॉलिवूडलाही लाजवेल अशी कलाकृती आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत. ‘मुगल-ए-आझम’पासून ‘शोले’ आणि ‘डिडिएलजे’ सारखे चित्रपट बॉलिवूडमधील माईलस्टोन ठरले आहेत. लोकनाट्यापासून सुरु झालेला हा सिनेसृष्टीचा प्रवास आता मालिकांपर्यंत पोहचला आहे. पथनाट्य, लोकनाट्य, व्यवसायिक रंगभूमीवर अजरामर कथानकांद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची किमया आपल्या कलाकारांनी साधली. आज मालिकाही प्रेक्षकांना अक्षरक्षा जून ‘खिळे’ ठोकले आहेत, अशाप्रकारे जाग्यावरुन हलू देत नाही, मात्र मालिकाकारांनी नाट्य‘संहिते’ला तिलांजली दिल्याचे प्रकर्षाने जाणवते.
कोणतीही कथा रचताना मग ती सिनेमातील असो, नाटकातील असो वा मालिकेसाठी असो, त्याची एक संहिता ठरलेली असते. कथेचा प्लॉट, त्यामधील पात्रांचा वावर, मध्यंतर आणि शेवट असे या कथानकाचे स्वरुप असते. मात्र मालिका या संहितेला अपवाद ठरत आहेत. आपण चित्रपटांचे अनेक भाग आल्याचे पाहिले असेल. बॉलिवूडमध्ये हे प्रकार फार कमी पहावयास मिळतात, मात्र हॉलिवूडमध्ये एका चित्रपटाचे दहा-दहा भाग झळकले आहेत. प्रत्येक भागाचा आशय वेगळा, विषय वेगळा, तरीही तो पूर्वीच्या भागाशी फारकत घेणारा मात्र नसतो. हे बॉलिवूडला कधीही जमले नाही. असो.. विषय आहे तो मालिकेंचा. आपल्याकडील मालिकांना तर तारतम्याचे भानच नसते. जेव्हा एकता कपुरने टीव्ही सिरियल विश्वास निर्माता म्हणून पाय ठेवले, तेव्हा खर्या अथाने ही अधोगती सुरु झाली. (आर्थिक दृष्ट्या नव्हे तर कथानकाच्या दृष्ट्या). मग त्या सासू-सुनांच्या मालिका असो, अथवा हॉरर मालिका असो, प्रत्येकाने आपल्या मुळ गाभ्यापासून फारकत घेतल्याचे दिसते. एखादे पात्र मरते काय, नि पुन्हा जिवंत होते काय, अशा कित्येक गोष्टी आहेत, ज्या मालिकांबाबत बोलता येतील. हे सर्व प्रकार झाले एका काल्पनीक कथांबाबत. मात्र ऐतिहासिक मालिकांनाही या निर्मात्यांनी सोडले नाही. त्यांनीही आपल्या पध्दतीने ऐतिहासिक मालिका बनविण्याचा घाट घातला आहे. सम्राट अशोक, बुध्द, जोधा-अकबर, रझिया सुलतान यांनी इतिहास गाजवला आहे. यांच्या कथानकावर आधारित मालिका बनविताना त्यांच्या ऐतिहासिक महत्वाचे भान ठेवून त्या बनवायला पाहिजे होत्या. मात्र तसे घडले नाही.
सध्या सम्राट अशोकाच्या जीवनावर आधारित मालिका कलर्स टीव्हीवर दाखवली जात आहे. मात्र या मालिकेतील कथानक मुळ अशोकाच्या विपरित आहे. सम्राट अशोकाचा आर्य चाणक्या यांच्याशी संबंध आला होता, असा एकही ऐतिहासिक दस्ताऐवज उपलब्ध नाहीत. तरीही मालिकेमध्ये आर्य चाणक्य आणि सम्राट अशोकाचा मेळ घातला आहे. त्यात नाट्यमय पध्दतीने घुसडविलेले ‘खुरासन’, ‘हेलना’, ‘जस्टीन’ ही पात्रे काल्पनिक आहेत. तर राजा बिंदूसारची राणी नूर हिचे अनैतिक संबंधातून झालेला ‘सियामक’ हा मुलगाही आहे. सम्राट अशोकाचा जन्म हा राजमहलात झाला आहे, असे इतिहास सांगतो. मात्र या मालिकेत विपरितच दाखविले आहे आणि हेच प्रकार ‘जोधा अकबर’, रझिया सुलताना या मालिकांबरोबर घडले आहेत. सो
नी टिव्हीवरील ‘महाराणा प्रताप’ही तोच कित्ता गिरवत आहे. आणि हे मालिकावालेही ‘यह धाराविक इस-इस ऐतिहासीक पात्र से प्रेरित है, इसका किसी भी जीवित या मृत व्यक्तीसे कोई संबंध नही है’ असे म्हणून मोकळे होतात. म्हणजे यांनी ऐतिहासिक पात्राला घेऊन काहीही खेळखंडोबा मांडायचा आणि तो आम्ही मुग गिळून पहायचा. ही खर्या अर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली आहे.
No comments:
Post a Comment