स्वातंत्र्य की सत्ता हस्तांतरण?
१५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आपला देश ब्रिटीशांच्या जाचातून मुक्त झाला, असेच मी शाळेत शिकलो, आणि इतर विद्यार्थीही याच इतिहासाची पुनरावृत्ती करत आहेत. मात्र खरेच भारताला १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले आहे की? हा संशोधनाचा विषय आहे. दोन दिवसांपूर्वीच आपला मानन्यात आलेला स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात आला, परंतु, हे स्वातंत्र्य होते की सत्ता हस्तांतरण? या प्रश्नाने गेली दोन दिवस मनामध्ये थैमान घातले आहे.
ब्रिटीशांचे फक्त भारतावरच राज्य नव्हते तर अर्धा जग ब्रिटीशांच्या आधीन होता. एशियासह यूरोपमधील देशांवरही ब्रिटीशांचे अधिपत्य होते. असे म्हटले जाते की, ब्रिटीशांच्या साम्राज्यात सुर्य कधी अस्त पावत नव्हता. म्हणजे जेथे सुर्योदय होत असे, तेथे ब्रिटीशांचे राज्य होते. मग एवढ्या विशाल साम्राज्याचे अधिपती सहजासहजी भारताला कसे सोडतील? हा प्रश्न सद्सद्विवेक बुध्दी असलेल्या नागरिकांना पडणार नाही तर नवलच! त्यासाठी १९४७ पूर्वीची पार्श्वभूमीचा अभ्यास असणे गरजेचे आहे. भारत स्वतंत्र व्हावा, यासाठी अनेक स्तरांवर लढा सुरु होता. क्रांतीकारकांचा बंड, समान हक्कासाठी न्यायपध्दतीने लढणारे राष्ट्रप्रेमी आणि यामध्ये ब्रिटीशांकडून जगण्याचा हक्क मागणारे समाजसुधार, अशा विविध स्तरावर स्वातंत्र्याचा लढा सुरु होता. प्रत्येकाच्या मागण्या वेगवेगळ्या होत्या. महात्मा ज्योतीराव फुलेंपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरपर्यंत निर्माण झालेल्या समाजसुधारकाच्या फळी देशातील पददलित, उपेक्षित घटकाला जातीवादातून मुक्तता मिळण्यासाठी झटली. तर बाळगंगाधर टिळकांपासून ते गांधी आणि नेहरुंनी सत्तेच्या हक्कासह, देशासाठी आम्हालाही स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार आहे, यासाठी लढा दिला. दरम्यान, १९१४ ते १९१८ पर्यंत पहिले महायुध्द झाले. या पहिल्या महायुध्दातच दुसर्या महायुध्दाची बीजे पेरली गेली होती. खवळलेल्या जर्मनीमुळे दुसरे महायुध्द छेडले गेले आणि भारताच्या स्वातंत्र्याची दारे मोकळी झाली. दुसर्या महायुध्दात ब्रिटीशांचाही सहभाग होता. ब्रिटीश ज्या पक्षाकडून या युध्दामध्ये उतरले होते, त्या पक्षाचा विजय होतो. मात्र या युध्दामुळे ब्रिटीशांची फार वित्तहानी झाली होती. आर्थिक दृष्ट्या ब्रिटीशांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, ‘‘ब्रिटीशांना दुसर्या महायुध्दामुळे आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांना भारतात राहून देश चालविणे कठीन गेले असते’’.
ब्रिटीशांची आर्थिक परिस्थिती बिघाडल्यामुळे भारतातून पाय काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तत्पूर्वी भारताकडे सत्ता सुपूर्द करणे क्रमप्रात्प होते. त्यामुळे १९४५ नंतर ब्रिटीशांनी भारतीय घटना समिती स्थापन करण्याची कार्यवाही सुरु केली. निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर देशाच्या सीमा ठरविण्यात आल्या. गव्हमेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९३५ नुसार देशाची फाळणी झाली. पाकिस्तान आणि भारत दोन वेगवेगळे देश झाले. भारताची सत्ता हस्तांतरण करण्यासाठीच्या करारावर लॉर्ड माऊंट बेटन, एडवीन बेटन आणि जवाहरलाल नेहरु यांच्या सह्या झाल्या. भारताचे संविधान बनविण्याची जबाबदारी घटना समिती गठीत करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमानंतर २६ नोव्हेबर १९४९ मध्ये संसदेत संविधान सुपूर्द केले. ते २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल दोन वर्षांनतर भारतीय कायदे-नियम लागू झाले. मग दोन वर्षे भारताचा कारभार कोणत्या घटनेनुसार सरु होता? यासाठी ब्रिटीशांनी स्वातंत्र्यानंतर ब्रिटीश गव्हर्नरची नियुक्ती केली होती. म्हणजे स्वतंत्र होऊनही ब्रिटीश गर्व्हनरच्या अधिपत्याखाली भारत होता. मग जे १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री १२ वा. झाले ते स्वातंत्र्य नव्हे सत्ता हस्तांतरण तर नव्हे ना? हा संशोधनाचा विषय आहे. Transfer of Power Agreement काय आहे? Dominion State म्हणजे काय? एक देश "One of the self-governing nations in the British Commonwealth" आणि दुसरा देश "Dominance or power through legal authority " याला काय म्हणायंच? या सर्व प्रश्नांची पुर्नंलोकन करणे ही काळाची गरज आहे.

No comments:
Post a Comment