बुध्द धम्म जितका व्यापक, गहन आणि खोल आहे; तितकाच तो सुटसुटीत आणि स्पष्ट आहे. त्यामुळेच आज जगभरातील लोकांनी हा धम्म स्विकारला आहे. धम्म स्विकारण्याचे दुसरे कारण सांगायचे झालेच तर ते या धम्माची शुध्दता! बौध्द धम्म सर्वांगाणी शुध्द आणि परिपूर्ण आहे. बौध्द धर्माची इतर कोणत्याही धर्माशी तुलना करणे म्हणजे हास्यास्पद ठरेल. सर्व धर्म संस्थापक स्वतःला इश्वर, इश्वराचा पुत्र, इश्वराचा दुत म्हणून स्वतःची ओळख करुन देतात; आणि आम्ही जे सांगतो तीच पूर्व दिशा, असे सांगून माणसाची सद्सद्विवेक बुध्दीचा वापर करण्यावरच टाळे जावायला सांगतात. उलटपक्षी बौध्द धम्म असा कोणताच दावा करत नाही.
सिध्दार्थ गौतम बुध्द यांचा जन्म कोण्या दिव्यशक्तीच्या जोरावर नव्हे तर सर्वसाधारण निसर्ग नियमानुसार राणी महामाया यांच्या पोटी झाला होता; तोही एका जंगलात. हजारों सैनिक आणि दासी यांच्या साक्षीने. तद्नंतर सर्व शिक्षण एक राजपूत्र म्हणून पूर्ण केले. शाक्य संघाचे सर्व अटीशर्तींसह सभासदत्व पत्कारले, संघासाठी कार्यही केले. दरम्यानच्या काळात कोलीय आणि शाक्य या दोन गणराज्यामधून वाहणार्या रोहणी नदीच्या पाणी वाटपावरुन दोन गटात वाद झाला. हा वाद थेट दोन्ही राजदरबारी गेला आणि पहिले पाणी कोण घेणार? या मुद्द्यावरुन शीतयुध्दासारखी परिस्थिती निर्माण झाली. दोन्हीकडील कोणीही कमीपणा घेण्यासाठी तयार नव्हते. अखेर शाक्य संघ सैन्यबलाने मजबुत असल्यामुळे त्यांनी युध्दाचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयाला सिध्दार्थने विरोध दर्शविला. शाक्य संघाचा युध्दाचा निर्णय पटला नाही, संघाच्या निर्णयाविरुध्द गेल्यामुळे सिध्दार्थला दंड देण्याचा निर्णय झाला आणि त्यांनी देशत्यागाची शिक्षा कबूल केली. (आजही ग्रामीण भागात वाळीत टाकण्याची प्रथा आहे, मात्र ही प्रथा संविधानाने नाकारली आहे)
बुध्दांचा प्रवास खडतर होता. सिध्दार्थ गौतमाने जेव्हा गृहत्याग केला, त्यावेळी तो एक राजपूत्र होता. सर्व सुखसोयींमध्ये वाढलेला राजपुत्र एका निर्जन जंगलात सन्यासाचा वेश धारण करुन साधनामध्ये तपू लागला. कोणताही धर्म आपल्या धर्मसंस्थापकाला अथक परिश्रमाच्या कसोटीतून जायला सांगत नाही. मात्र बुध्द धर्म हा एक असा एकमेव धर्म आहे, ज्यामध्ये अरहंत, बुध्द बनण्यासाठी कठोर साधना करावी लागते. दहा पारमीता पूर्ण कराव्या लागतात. कठोर शीलांचे पालन करावे लागते, गंभीर ध्यानसाधना करावी लागते. हे सर्व सिध्दार्थ गौतमाने केले आणि वैशाख पौर्णिमेला बुध्दात्व प्राप्त झाले.
बुध्द धम्माचा पाया हा दुःखाशी निगडीत आहे. दुःखमुक्ती हा एकमेव उद्देश धम्माचा आहे. जगात दुःख का? हा प्रश्न सिध्दार्थला नेहमी सतावत होता. त्यामुळे त्यांनी दुःखाचे मुळ शोधण्यासाठी कठोर साधना केली. विपस्सनेचा शोध लावला आणि दुःखाचे मुळ शोधले. तृष्णा हे दुःखाचे मुळ कारण आहे. आसक्ती, जगण्याची इच्छा दुःखाचे विणते. इच्छा असो वा तिरस्कार असो, दोन्ही तर्हेने फक्त दुःखच उत्पन्न होते. हे त्यांनी जाणले. त्यावर मात कशी करायची, याचाही त्यांनी मार्ग शोधला. सर्व तृष्णांचे मुळ आसक्ती आणि द्वेश आहे. जो कोणी कोणत्याही धर्माचा असो वा पथाचा प्रत्येकाचे दुःख सारखेच असते. ठेच लागली की प्रत्येकाच्या पायातून रक्तच येते. दुःखदच वेदना होते. त्यामुळे भिन्न असे काहीही बुध्दांनी सांगितले नाही. जे काही सांगितले ते मानसाच्या मनाशी निगडीत सांगितले. कोणत्याची दैवी चमत्काराच्या गोष्टी केल्या नाहीत. अवताराचा दावा केला नाही. स्वतःला मोक्षदाता म्हंटले नाही. उलटपक्षी इतर धर्म संस्थापकांनी स्वतःला देवच सिध्द केले. बुध्द धम्म शुध्द आणि वास्तववादी असल्यामुळेच कदाचित आज या धम्माच्या अनुयायांची संख्या जास्त आहे.
No comments:
Post a Comment