‘मांझी-द माऊटंन मॅन’, ‘निरजा’, ‘साला खडूस’, ‘मेरी कॉम’ सारख्या वास्तववादी चित्रपटांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. नाट्यक्षेत्रातही समाजाला दिशा देण्याचा ‘प्रयोग’ यशस्वी होत आहे. परंतु, सध्या टेलिव्हीजनवरील मालिकांनी आपली पट्टी सोडली आहे. कथानकाचा पार चोता होईपर्यंत ते चिघळले जात आहे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील मालिकांची तर सहिंताही राहिली नाही. कोणतेही कुठेही संदर्भ जोडून ते प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहेत. विशेषतः महिलांच्या. कारण मालिका निर्मार्त्यांचा सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग कोण असेल तर त्या महिला.
टीव्ही मालिकांमध्ये कथानकाचा अत्तापत्ताच नसतो. रेटेल तशी मालिका पुढे रेटली जाते. पाट्या टाकण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. कुठूनही काहीही घुसडवणे ही मालिकांची ‘युएसपी’आहे. आणि आजचा महिलावर्ग या मालिकांमध्ये गुरफटला जातोय. पूर्वीच्या काळी महिलांना स्वातंत्र्य नव्हते. अमानुष नियम त्यांच्यावर लादले जायचे. केरमळमधील इझावास अशी एक अस्पृश्य जमात होती. या जमातीच्या महिलांना कंबरेवरील कपडे घालणे वर्ज्य होते. अर्थात लज्जा झाकण्याचीही त्यांच्यावर बंदी होती. याला मानुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणणेही कमी पडेल. निर्दयी, क्रुर आणि लांछनास्पद प्रकार आपल्या भारतात महिलांबाबत व्हायचे. सध्या महिलांवर अत्याचार होत असल्याची ओरड आहे. दिवसेंदिवस बलात्कारच्या घटना घडत आहे. कॉंग्रेस म्हणतेय भाजपाच्या काळात महिलांवर अत्याचार वाढले; तर भाजपा म्हणते, कॉंग्रेसच्या काळात महिलांची सुरक्षा बिकट होती. हे फक्त टोलवाटोलवीची उत्तरे झालीत. पण वास्तविक पाहता, हजारो वर्षांपासून महिलांची अब्रु लुटली जात आहे, ती आजही सुरु आहे. फरक एवढाच पडलाय की, त्यावेळी महिलांना वाचा नव्हती, ती आज आहे. महिलांना सामजिक स्वातंत्र्य मिळाले आहे, पण या सामाजिक स्वातंत्र्यांचा महिला केवळ रटाळ मालिक पाहण्यात आपला वेळी घालवत आहेत. आजकालच्या निर्मात्यांनी महिलांची नस ओळखली आहे. त्यांनी ऐतिहासिक मालिकांमध्येही ‘घोटाळा’ सुरु केला आहे.
आजकालचे निर्माते ‘ही ही मालिका त्या त्या काळातील संदर्भ, लोककथा, काल्पनीकतेची जोड देऊन बनवलेली आहे, याचा वास्तवाशी संबंध नाही’ अशी मालिका सुरु होण्यापूर्वी सूचना देऊन मोकळे होतात. मध्यंतरी अकबरची मालिका फार गाजली होती. महिलांनी ही मालिका अक्षरशः डोक्यावर घेतली होती; ती यासाठी नव्हे की यातून अकबरचा इतिहास उलगडेल, उलटपक्षी बहुतांशी महिलांना या मालिकेली ‘सलीम’वर प्रेम जडले होते. पण कथानकात तारतम्य नसल्यामुळे ही मालिका फार काळ तग धरू शकली नाही. आता ही बाब कलर्स टीव्हीवरील सम्राट अशोकाच्या मालिकेबाबत सांगता येईल. सम्राट अशोकाने फक्त भारतावरच नव्हे तर जगावर आपली छाप सोडली. बौध्द धम्म स्विकारुन पंचशीलचा झेंडा अटकेपार रोवण्याची किमीया अशोकाने केली. पण सध्या त्याच्या नावावर सुरु असलेल्या मालिकेला कोणतेही तारतम्य उरले नाही. मुळात अशोकाबाबत इतिहासाकडे कमी माहिती उपलब्ध आहे; किंबहूना अशोकाचा इतिहास नालंदाच्या अग्नीमध्ये भस्मसातही झाला असेल. नालंदा विद्यापीठावर हल्ला केल्यानंतर भिक्षुंच्या कत्तली झाल्या, विद्यापीठ सहा महिने जळत होते, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे आता अशोकाच्या लहानपणाबाबतची माहिती तोटकीच उपलब्ध आहे. आणि कलर्स टीव्हीवरील प्रसारित होणार्या मालिकेच्या निर्मात्यांनी तर अशोकाचा नवा इतिहासच रचायला सुरुवात केली आहे. बिंदूसार राजा हा मुळात शुर-पराक्रमी होता, अशी वर्णने इतिहासात उल्लेखीत आहेत. पण या मालिकेमधील बिंदूसार हा इतरांच्या बुध्दीनूसार आपली मतं बनवणारा दाखवला आहे. त्यात मध्यंतरी चाणक्याचे विनाकारण घुसडवलेले पात्र न पचनी होते. सध्या हे पात्र जरी मृत असले, तरी वेळोवेळी चाणक्य होता; आणि तो अशोकाचा गुरु होता हे प्रक्षकांवर बिंबवण्याचा प्रयत्न वारंवार होताना दिसतो. मुळात अशोकाचा आणि चाणक्याचा केव्हाही संबंध आला नव्हता. अशोकाचे आजोबा, चंद्रगुप्त मोर्या यांचे ते राजकीय सल्लागार होते. अशोकाची ‘स्टोरी’ ही खरी बौध्द धम्म स्विकारल्यानंतर सुरु होते. भारताला आपल्या अधिपत्याखाली आणण्याच्या मनशाने त्याने स्वतःला युध्दात झोकून दिले. तर निर्णायक लढाई कलिंग या लोकशाहीपुरस्कृत गणतंत्र राज्यासोबत झाली. कलिंगनेही अशोकाला कडवी झुंझ दिली; पण विजय शेवटी अशोकाचा झाला आणि हाच अशोकाच्या लाइफमध्ये टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा रक्तपात नको, अशी शपथ घेतल्यानंतर धम्माची कास धरली आणि प्रवास झाला तो विश्वशांतीचा. पण आज कलर्स मालिकेद्वारे अशोकाची प्रतिमा चुकीच्या पध्दतीने मांडण्याचा अट्टाहास होतोय. अशा अनेक मालिका आहेत, ज्या वास्तवाशी निगडीत असून काल्पनिक आहेत. तर काही काल्पनिक मालिकांच्या संहितेचा पत्ता नाही. पूर्वी जाचक अटी लादून महिलांना घरात बसवले जायचे. त्यांचे पाय दोरखंडाने बांधले जायचे. आता फक्त फरक एवढाच आहे की, या मालिकांनी त्यांच्या मनाला जेरबंद केले आहे. हा पिंजरा तोडण्याची आता गरज आहे.
No comments:
Post a Comment