‘सेक्सपिअर’ एक ‘वादळी’ नाव... हे नाव आज साहित्यक्षेत्रात अच्युत्य मानाने घेतले जाते. पंधराशेच्या शतकात त्यांनी रचलेल्या कथा आजही जीवंत आणि चालू घडामोडीशी निगडीत वाटतात. आई मुलाचे प्रेमसंबंध पण ते ‘त्या’ वेगळ्या अर्थाने मांडणारा सेक्सपिअर पंधराशेमध्ये जन्मला. एका स्त्री-पुरुषाचे नाते हे कशा पध्दतीने बदलू शकते, हे त्याने आपल्या कथांमधून वेळोवेळी मांडले; पण सेक्सपिअरच्या कथांचा वास्तवाशी संबंध लावताना भारतीयांना थोडे जड जाते. कारण ‘मुक्त’नातेसंबंध तर सोडाच, येथे महिलांना न्यायहक्कांसाठी आंदोलने उभे करावे लागत आहेत.
अगदी ‘रानटी’काळाचा अभ्यास केला असता, हजारो वर्षांपूर्वी जेव्हा मानव गुफांमध्ये वास्तव करत होता, तेव्हाही स्त्री ही प्रजनन करणारी वस्तू आणि संघ वाढवणारी मशीन म्हणून तिचा वापर होत होता. त्यावेळी महिलांचे अपहरण हे सर्रास व्हायचे. ज्याचा ‘गट’ मोठा, तो नेता...आजही थोड्याबहुत फरकाने हेच सुत्र वापरले जाते. असो, शिकार करुन उपजीविका भागवत असताना मानवाला शेतीचा शोध लागला. आता हे वेगळे सांगायला नको की, शेतीचा शोध हा एका स्त्रीने लावला. स्त्रीने शेतीचा शोध लावला आणि नव्या क्रांतीला सुरुवात झाली. शेतीचे तंत्र पुरुषांनी स्त्रीकडून शिकून घेतले; आणि पुन्हा स्त्रीला गुलाम बनवले. ही गुलामी आजही कायम आहे. केवळ गुलामीची परिभाषा बदलली आहे.
हाजीआली दर्गा आणि शनिशिंगनापूरच्या वादावरुन स्त्री गुलामी पुन्हा अधोरेखीत झाली. नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश ते शनिशिंगनापूर चौथारा दर्शन, या ७० वर्षांच्या काळात भारतीयांच्या मनात ‘रिव्हॉलूशन’ खरेच झाले का? हा संशोधनाचा विषय आहे. अस्पृशांना येथे ‘हक्क’ म्हणजे काय? ‘न्याय’ कशाला म्हणतात? हेच माहित नव्हते. पण शिवरायांनी त्यांना सन्मान दिला, मान दिला. आता ही वेगळी गोष्ट आहे की, तो सन्मान काय फार काळ टिकू शकला नाही. पेशवाई आली आणि गुलामी पुन्हा सुरु झाली. याआधीही त्यांच्या आयुष्यात सन्मानाचे काही ‘दिवस’ आले होते. उदा. बुध्दांचा काळ, सम्राट अशोकाचे शासन, ब्रुहदत्त, कृष्णा, कनिष्क असे बौध्द राजे होऊन गेले, ज्यांनी आपल्या साम्राज्यात समानता प्रस्तापित केली. पण क्रांतीनंतर प्रतिक्रांती झाल्यामुळे एक वर्ग नेहमी अन्य वर्गाच्या अधिपत्याखाली राहिला. मोगलांच्या साम्राज्यातही अस्पृश्यांची अवस्था वाईटच होती. कारण वर्णव्यवस्था अबाधित होती. पण ब्रिटीशांचे शासन आले आणि आम्हीही माणूस आहोत, याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. अन् लढा झाला तो १ जोनवारी १८१८ चा! पेशवाई संपली. पण सामाजिक समता यायला थोडा वेळ लागलाच. महात्मा जोतीराव फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली आणि त्यांचा समाजकार्याचा वारसा डॉ. बाबासाहेबांनी पुढे चालवला. त्यांनी १९३० मध्ये मंदिर प्रवेशासाठी आंदोलन उभारले. काळाराम सत्याग्रह केला. तेव्हा आंदोलन झाले, हे समजू शकते, पण आता मंदिर प्रवेशासाठी भारतात आंदोलने होत आहेत, ही लज्जास्पद बाब नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडल्या आणि सरतेशेवटी समाजव्यवस्थाच बदलून टाकली. संविधानाच्या माध्यमातून हजारो वर्षांपासून सुरु असलेली ‘कु’व्यवस्थेला धुळ चारली. आजच्या घडीला अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा आहे. तरीही शनी चौथार्यासाठी महिलांना आंदोलन करावे लागत आहे. महिलांच्या मासिक धर्मावेळी त्या मंदिराबाहेर राहतात. मग ही अस्पृश्यता नव्हे का?
मुंबईतील सीएसटी फॅशन स्ट्रिटला लागूनच जैन धर्मियांसाठी एक पाणपोई आहे. येथे बिगर जैन नागरिकांना पाणी पिण्यास मज्जाव केला जातो. पूर्वी अस्पृश्यांनी सार्वजनिक पाणवठा येथून चुकून पाणी जरी प्यायले, तर त्याची खैर नसे. आता फक्त विनंतीपूर्वक नकार दिला जातो, एवढाच काय तो बदल झालेला आहे. महिला मासिक‘धर्मा’वेळी मंदिरात जाणे टाळतात. ही एकप्रकारची मानसिक गुलामी नव्हे का! महिलांना पाळी येणे ही एक नैसर्गिक बाब आहे, मग न्यूनगंड का बाळगावा? आणि त्याचा मंदिरात न येण्याचा काय संबंध? म्हणजे तुमचा देव इतका कमकूवत आहे का की त्याला एका महिलेच्या स्पर्शाने विटाळ होईल? अशूध्द होईल? मुळात दगड बाहेरचा असो वा आतला, तो कोणत्याही अर्थी शुध्द अथवा अशुध्द होऊच शकत नाही. पण आपली पोळी भाजण्यासाठी काहींनी आपला ‘तवा’ शेकायला ठेवला आहे; आणि नकळत आम्हीही त्यांची ज्या चूलीवर पोळी भाजली जात आहे, त्याला अग्नी देण्यासाठी लाकडांचा पुरवठा करत आहोत.

No comments:
Post a Comment