हातावर जळता कोळसा ठेवला, तर त्याचा परिणाम काय होईल, हे वेगळे सांगायला नको. हात जळल्याशिवाय राहणार नाही. याचीच पुनरावृत्ती भारत करत तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानाबरोबर मैत्रीपुर्ण संबंध विकसित करण्याच्या मुद्याला आज दुजोरा दिला. पण आपल्या सैनिकांची तिरडी खांद्यावर घेऊन कोणी कसे बरे त्यांच्याशी मैत्री करु शकेल. का आपण इतिहासातून काहीच धडे घेत नाही?
मैत्री प्रस्तापित करणारा देश म्हणून जगाच्या पाठिवर भारताची ओळख आहे. म्हणून काय कोणीही यावं आणि टिकली मारुन जावं, इतकी बिकट अवस्था आमच्यावर आली आहे का? जेव्हा ‘चीन’ची ठेस लागली, तेव्हाच आपण शहाणे होणे गरजेचे होते. तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु यांनी चीन बरोबर शांततेचा ‘पंचशील’ करार केला होता. मात्र या कराराचे उल्लंघन करीत चीनच्या सैनिकांनी सीमेवर हल्लाबोल केला. चीनने अनपेक्षित लादलेल्या या युध्दाचा सामना भारताच्या सैनिकांना करावा लागला; आणि शिखस्तही खावी लागली. याच युध्दाची परिणीती म्हणून आजही आपला काही भु-प्रदेश चीनच्या ताब्यात आहे. खरे म्हणजे तेव्हा भारत युध्दासाठी तयारच नव्हता. स्वातंत्र्यानंतर लगेचच भारताला युध्दाचा सामना करावा लागला. १९४७ ते ४८ दरम्यान काश्मिर मुद्दावरुन भारत-पाक युध्द झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंतर्गत वादाची घडी व्यवस्थित करण्यात सरकार व्यस्थ असताना युध्दामुळे पुन्हा आर्थिक बोजा भारताला सहन करावा लागला. त्यानंतर १९६५, १९७१ च्या युध्दाची भर पडली. याचा विपरित परिणाम आपल्या पंचवार्षिक योजनांवरही झाला. एकंदर विकास खुंटला. आता वर्तमानातही आपण दहशतवादचा सामना करण्यात आपला वेळ खर्ची घालत आहोत.
पाकिस्तान हा आपला कट्टर शत्रु आहे, हे जगजाहीर आहे. पाकने जगाच्या पाठिवर आपली प्रतिमा अबाधीत राखण्यासाठी दहशतवादाला जन्म घातला. मुंबईतील १९९३ बॉम्बस्फोट ही त्याची सुरुवात होती. कधी काळी दहशतवादाने फक्त भारताला पोखरले होते, तेव्हा इतर राष्ट्रांनी दहशतवाद बोकळू दिला, आणि आता तो त्यांच्याही उरावर बसू पाहतो आहे, याची जाणीव होताच आता जगभरातील देश दहशतवाद संपविण्यासाठी एकवटले आहेत. दहशतवादाचा उदय ज्या देशातून झाला त्या पाकलाही आता पेरलीली ‘बाभळ’ टोचत आहे. त्यामुळे आता भारताच्या दहशतवादावर चर्चा करण्याच्या प्रस्तावाला तिकडून हिरवा कंदिल मिळतोय. काही महिन्यांपूर्वी दहशतवादावर चर्चा करण्यासाठी दोन्ही देशांकडील राष्ट्रीय सुरक्षा संलागार यांच्यात चर्चा होणार होती. मात्र काश्मिर मुद्दा उपस्थित करत पाकने या चर्चेत खो घातला; परिणामी नियोजित चर्चेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. खतपाणी घातलेल्या पाकचा आदर्श घेत आता नवी दहशतवादी संघटना उदयास आली आहे. आयसिसने सिरीयात दहशत माजवली आहे. युरोपिय देशांवर आक्रमण होत आहे. अलीकडेच पॅरिसवर मुंबई २६/११ सारखा दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर फ्रान्सने दहशवाद्याला ठेचून काढण्याची मोहिम आखली असून इसिसच्या तळांवर क्षेपणास्त्रेही डागली आहेत. आणि दुसरीकडे दहशतवाद मुद्द्यावर चर्चा करण्यापासून पळ काढणार्या पाकनेही आता मान मुरडत चर्चेसाठी सकारात्मकता दाखवली आहे. अलीकडेच उफा आणि पॅरिसमध्ये शरिफ आणि मोदींची चर्चाही झाली. पण आता ही चर्चा पुढे सुरु ठेवण्यासाठी युध्द नको, अशी भूमिका परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतली. त्यांच्या भूमिकेविषयी दुमत नाही; पण युध्द नको, हे जगजाहीर करण्याची काय गरज होती. तिकडे शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे, आणि इथे आम्ही गप आहोत. हा आपला दुबळेपणा की सहनशीलता? उलटपक्षी देशाच्या परराष्ट्रमंत्री या नात्याने त्यांनी खणखाऊन सांगायला पाहिजे होते की, जर कोणी आमच्या नादी लागेल तर त्याची खैर नाही. दहशतवाद हा कळीचा मुद्दा आहेच आणि त्याला संपविणसाठी परराष्ट्रांचे सहकार्य गरजेचे आहे. मग तो पाकिस्तानही का नसो, पण सारासार विचार केला तर आपल्याला धोका हा इसिसपेक्षा लष्कर-ए-तोयबाकडून जास्त आहे आणि लष्कर-ए-तोयबाला लहानाचे मोठे पाकने केले. त्यामुळे पाकसोबत मैत्रीची भाषा नको, तर नाक दाबून बुक्का मारण्याची गरज आहे.

No comments:
Post a Comment