Wednesday, 18 March 2020

लिपींचे उगमस्थान ‘ब्राम्ही’

भारतात प्रत्येक राज्यांची आपली एक विशेष भाषाशैली आहे आणि त्या भाषेला स्वत:चा एक समृद्ध इतिहास आहेमैलागणिक या भाषांच्या देहबोलीत बदल आढळतोमुंबईत बोलणारी हिंदी आणि बिहारमधील हिंदी दोघांमध्ये बरीच तफावत आहेसाम्य केवळ ‘देवनागरी’. हिंदीगुजरातीमराठीभोजपूरी इत्यादी भाषा उच्चारताना वेगवेगळ्या भासत असल्या तरी त्यांची लिपी मात्र एकच आहेती म्हणजे ‘देवनागरी’.  देवनागरी उत्तर भारतात वापरली जातेतर द्रविडीनय लिपीचा दक्षिण भारतात वापर होतोभारतात आज अनेक वैविध्यपूर्ण लिपी आहेत आणि या लिपींचा इतिहासही तितकाच रोचक आहे.
भारताला प्रचीन इतिहास लाभलेला आहेयेथे एकेकाळी ६४ लिपी अस्तित्वात होत्याअसा उल्लेख ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात सापडतोअसे असले तरी उत्खननात केवळ दोन प्राचीन लिपींचे पुरावे सापडले आहेत. ‘खरोष्ठी’ आणि ‘ब्राम्ही’ या दोन लिपी उत्खननात आढळल्याऊर्दूप्रमाणे उलटे लिहले जाणाऱ्या ‘खरोष्ठी’ लिपीतील लेख कंदहारअफगाणिस्तानतक्षशिलामान्सेरालडाखतुर्कस्थान अशा ठिकाणी सापडले आहेतपरंतुहिंदूकुश पर्वताच्या उत्तरेला या लिपीचा प्रसार झाल्याचे दिसत नाहीब्राम्ही लिपीतील लेख मात्र आजही भारताच्या कानाकोपऱ्यात सापडतातत्यामुळे भारतातील सर्वदूर लोकांना ही लिपी वाचता येत असावीअसा अंदाज आहेजेथे ब्राम्ही लिपी वाचता येत नाहीतेथे खरोष्ठी लिपीचा वापर झाला असावापण खरोष्ठी लिपीचा विकास झाल्याचे आढळत नाही.‘ब्राम्ही’ लिपीचा उत्तरोत्तर विकास झाल्याचे पहावयास मिळते.
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने कोरलेले शिलालेख आणि लेण्यांतील लेखांतून ‘ब्राम्ही’ आजही वाचता येऊ शकतेसम्राट अशोकपासून ते ग्रुप्ता कालखंडापर्यंत  ‘ब्राम्ही’ वापरात असल्याचे पुरावे सापडतातपाल साम्राज्य अर्थात इसवी सन सातव्या ते बाराव्या शतकापर्यंत ‘ब्राम्ही’ लिपी लिहली-कोरली जायची आणि त्यावेळच्या लोकांना ती वाचताही यायचीअर्थात सम्राट अशोकाच्या काळातील ‘ब्राम्ही’ आणि सातव्या-आठव्या शतकातील ‘ब्राम्ही’ यामध्ये अमुलाग्र बदल झालेले होतेपरंतुमूळ ढाचा तोच होतापण बाराव्या शतकानंतर ही लिपी लोप पावलीइतका प्रदीर्घ इतिहास असतानाही त्यानंतर ‘ब्राम्ही’ कोणालाही वाचता येत नव्हतीहे भारताचे दुर्देवच म्हणवे. ब्रिटीश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांच्या सात वर्षांच्या निरंतर परिश्रमानंतर ही लिपी पुन्हा प्रकाशात आलीया लिपीचे वाचन करण्यात त्यांना यश मिळालेत्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास मुख्यत्वे बौद्धकालीन इतिहास जगासमोर आलाजेम्स प्रिन्सेपपूर्वीही या लिपीचे वाचन करण्याचा प्रयत्न झाला होतामात्र तो यशस्वी झाला नाहीसोळाव्या शतकात दिल्लीचा बादशाह फिरोजशहा तुघलक यांनी मोठ्या परिश्रमाने ब्राम्ही शिलालेख असलेले स्तंभ पंबाजमधील टोपडा आणि मीरठ येथून दिल्लीला आणलेअनेक पंडितांनी हे शिलालेख वाचण्याचा प्रयत्न केलामात्र त्यांना त्यात यश आले नाही.  १८३७ च्या दरम्यान जेम्स प्रिन्सेप यांना हे लेख वाचण्यात यश आलेसर्वप्रथम ‘’ आणि ‘’ हे अक्षर त्यांनी ओळखलेत्यानंतर विस्कटलेली ‘अट्ठकडी’ उमजलीआज जेव्हा देवनागरी तसेच दक्षिण भारतातील लिपींच्या उगमस्थानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता उत्तर ‘ब्राम्ही’ हेच मिळते.
ब्राम्ही लिपीचा इतर लिपींवर प्रभाव कसाहे समजायचे असेल तर त्यासाठी तुलनात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे. ‘ब्राम्हीमध्ये ‘’ हा गणितातील ‘लंबचे चिन्ह किंवा इंग्रजीतील उलटा ‘टी’ प्रमाणे लिहला जातोदेवनागरीमध्ये ‘’ असा आहेआता या दोघांमध्ये तुलना केली असता दिसून येते कीउलट्या ‘टीमधील खालची दांडी मध्यभागी सरकल्यानंतर ‘देवनागरी’ लिपीतील ‘’ अक्षर तयार झालेअर्थात हा बदल क्षणात नव्हता झालेला नव्हताकित्येक वर्षांच्या स्थितांतरांनंतर ‘ब्राम्हीतून आजची ‘देवनागरी’ लिपी अस्तित्वात आली. ‘ब्राम्हीमधील एक असेही अक्षर आहे जे जसेच्या तसे राहिलेते म्हणजे ‘’. ‘ब्राम्हीच्या ‘मध्ये काहीच बदल  झाल्यामुळे आजही ज्याच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होत नाहीत्यांना ‘’ म्हणून उपहासात्मक डिवचले जाते. ‘देवनागरीतील ‘’ उलटा लिहल्यास तो ‘ब्राम्हीचा ‘’ होईलअशी अनेक दाखले देता येतील.
प्रत्येक काळखंडातील ब्राम्हीमध्ये बदल होत गेल्याचे उत्खनानातून सापडलेल्या शिलास्तंभलेण्यांमधील कोरीव लेखनाण्यांवरील लेख यावरून स्पष्ट होतेउत्तरेत जशी ‘देवनागरी’ विकसित झालीतसेच पाचव्या शतकात दक्षिण भारतात ‘ब्राम्हीतून ‘ग्रंथा’, ‘कडम्बा’ या दोन लिपी विकसित पावल्यानंतर ‘ग्रंथामूधन ‘तामिळ, ‘मळ्यालम’ तर दहाव्या शतकातील ‘जुन्या कडम्बामधून ‘कनडा’ आणि ‘तेलगू’ लिपी अस्तित्वात आल्याया लिपी हजार वर्षांपूर्वीच्या असून आजही वापरात आहेत. ‘ब्राम्हीतील ‘’ हा चौकोन आकाराने दर्शवला जातोतर चौकानातील वरच्या बाजुची रेघ मिटवली की तो बनतो ‘तामिळमधील ‘’. हे जे बदल होत गेले ते तत्कालीन काळखंड आणि राज्यांच्या प्रभावाचा परिणाम आहे.
चौथ्या ते पाचव्या शतकात गुप्त काळखंडात ‘ब्राम्ही’ वळणदार होती.  आठवे शतक येईपर्यंत झाडाच्या सालीवर लिहण्याची कला अवगत झाली होतीत्यामुळे अक्षरावर रेघ आणि सुटसुटीत  निटनिटकेपणा तेव्हापासून रूढ झालाब्राम्हीमधूनच निर्माण झालेल्या ‘शारदा’ लिपीतून हे दिसून येतेतत्कालीन वेळी काश्मीरी खोऱ्यात या लिपीचा सर्रास वापर व्हायचाशारदाप्रमाणे समांतर इतर लिपीही विकसित होत होत्यात्यापैकी एक ‘नागरी’ लिपी होयताम्प्रपत्रावर लिहल्या जाणाऱ्या आठव्या शतकातील ‘नागरीतूनच नंतर अनेक लिपींनी जन्म घेतला. ‘नंदी नागरी’, ‘लेट नागरी’, ‘आसामी’, ‘बंगाली’, ‘ओरीसा’, ‘गुजराती’, ‘गुरूमुखी’ या सर्व लिपी अकराव्या ते सोळाव्या शतकाच्या काळखंडात उदयास आल्याया ‘नागरीतूनच आपल्या ‘देवनागरीने जन्म घेतला आणि या सर्व लिपींचे उगमस्थान म्हणजे ‘ब्राम्ही होयआज भारताची प्राचीन लिपी म्हणून ब्राम्हीला मान्यता आहेपण त्यापूर्वीही लिखान होतेहे हडप्पा-मोहेन्जदाडो संस्कृतीत मिळालेल्या अवशेषांतून दिसून येतेपरंतुतेव्हा मिळालेले इन्स्क्रीप्शन अद्याप कोणालाही वाचता आलेले नाहीतपण संशोधन सुरू आहेउत्खननाद्वारे मातीत दबून राहिलेले  पुरावे बाहेर निघतील आणि तत्कालीन लिपीमधून लिहलेल्या लेखांद्वारे आणखी नवी संस्कृती प्रकाशात येईल.

Tuesday, 24 September 2019

मोर्यकालीन स्तुपाचे संवर्धन हे कर्तव्यच!

इतिहासाच्या पानांतील मजकुर आणि त्याच्या सत्यतेची पाडताळणी करावयाची असेल, तर त्या काळातील ‘हेरिटेज’ वास्तुंचा अभ्यास करावा लागतो. शिलालेख, नाणी, नाण्यांवरील बोधचिन्हे आदींच्या सखोल अभ्यासानंतर इतिहासाला भक्कम पुरावा मिळतो. हे पुरावे कधी थेट जंगलाआड, डोंगरात दडलेले असतात तर कधी मातीच्या कुशीत आपल्या शोधकर्त्याची वाट पाह
त असतात. त्याला हुडकून काढण्याची आणि नवा इतिहास जगासमोर मांडण्याची जबाबदारी ही त्या त्या पिढीच्या खांद्यावर असते. पण भविष्यातील संशोधकांसाठी आपण त्यांच्या अभ्यासाचा अधारच नष्ट करत असू, तर त्यापैक्षा दुर्देव दुसरे काय असेल.
दिल्लीतील सहाशे वर्षांपूर्वीचे रविदासांचे मंदिर असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असो, सरकारने या ऐतिहासिक वास्तु जमिनदोस्त केल्या. ऐतिहासिक वारसे जपण्यात सरकारला किती स्वारस्य आहे, हे या दोन उदाहरणांवरून स्पष्ट झाले. पण येथे विषय निघाला तो महाराष्ट्रातील मौर्यकालीन भोन स्तुपावरून. भोन स्तुप नष्ट करण्याच्या मार्गावर सरकार असून हे स्तुप वाचवण्यासाठी लढा तीव्र झाला आहे. 

मौर्यकालीन साम्राज्याचा इतिहास जगासमोर मांडला तो भारतीय पुरातत्व विभागाचे जनक सर अलेक्झेंडर कनिंग्हॅम यांनी. चीनी प्रवासी ह्युयेनस्तांग यांच्या डायरीमुळे त्यांना तत्कालीन भारताचा भुगोल समजला. ह्युयेनस्तांग भारताच्या भ्रमंतीवर ६ व्या शतकात आले होते आणि त्यांनी भारताचे वर्गीकरण पूर्व, पश्िचम, उत्तर दक्षिण आणि मध्य भारत असे केले आहे. आजही त्याच वर्गीकरणानुसार भारताचे वर्णन केले जाते. त्यांच्या डायरीच्या आधारावर कनिग्हॅम यांनी बुद्धांच्या एेतिहासिक पुराव्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेलेली शहरे, स्तुप आणि दुर्गम डोंगरात दडलेल्या वास्तुकलेचा अद्भुत नमुना असलेल्या लेण्या त्यांनी प्रकाशात आणल्या. पुरातत्व विभागाची स्थापना झाल्यानंतर मुघलकालीन ऐतिहासिक स्थळे संरक्षित तर झालीच, त्याचप्रमाणे २५०० वर्षांपूर्वीचा इतिहासही समोर आला.
भारतात एकेकाळी बौद्ध धर्म सर्वत्र विस्तारलेला होता. त्यामुळे त्याच्या खुणा या आजही सापडत आहेत. असेच काही पुरावे २००२ मध्ये विदर्भात सापडले. भोन स्तुपाचा शोध  २००२ मध्ये डॉ. बी. सी. देवतारे यांनी लावला आणि येथे उत्खननाने जोर धरला. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात मौर्यकालीन बौद्ध स्तुप आढळले. येथे २००३ पासून उत्खनन सुरु झाले आणि २००७ मध्ये उत्खननाचे काम थांबवले. भोन गावाजवळील पूर्णा नदीकिनारी बौद्ध स्तुप सापडले. त्यामुळे याचे नामकरण भोन स्तुप झाले. पुर्णा नदीकिनारी अनेक छोट्या-मोठ्या टेकट्या आहेत. या टेकड्या १० ते १२ हेक्टर परिसरात पसरल्या आहेत. टेकटी क्रमांक ६ येथे उत्खननादरम्यान हे स्तुप आढळले. हे स्तुप साधारण इसवी सन पूर्व ३०० शतकातील असल्याचे सिद्ध झाले. येथे सापडलेल्या तांब्याच्या नाण्यांवर बोधिवृक्षाची (पिंपळाचे झाड) प्रतिमा आढळली. तसेच एका पत्र्यावरही बोधिवृक्ष आढळून आला. टेराकोटा अर्थात विशेष प्रकारच्या मूर्तीवर ‘त्रिरत्न’ आढळले. एवढेच नाही तर येथे पाणी व्यवस्थापनासाठी विशिष्ट्य रचना असल्याचे आढळून आले. त्यामुळे येथे उत्खनन वेगाने होण्याची गरज भासू लागली. मात्र इतके भक्कम पुरावे आढळल्यानंतरही पुरातत्व विभागाने २००७ नंतर येथील उत्खनन बंद केले. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
असो, उत्खनन थांबले इथपर्यंत ठिक आहे, पण हा ऐतिहासिक वारसाच नष्ट करण्याचा डाव तत्कालीन काँग्रेस सरकारने मांडला आणि त्यानुसार पुरातत्व विभागाचा ना हरकत प्रमाणपत्र घेऊन येथे जीगाव धरण प्रकल्प सुरु केला. मुळात येथे आणखी उत्खनन होणे गरजेचे होते. उत्खनन झाले असते तर नवीन काही हाती लागले असते. २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार निवडून आले. यावेळी सरकार ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच. काही महिन्यांपूर्वीच्ा दिल्लीतील रविदास मंदिर जमिनदोस्त करण्यात आले. अर्थात हे मंदिर तोडण्याचे आदेश दस्तरखुद्द सर्वाेच्च न्यायालयातून आले होते. त्यामुळे हा निर्णय चुकीचा हाेता, असे म्हणणे म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेचा अपमान करण्यासारखे ठरेल. पण जनभावना लक्षात घेता मंदिराचे संरक्षण करून संवर्धन करणे हे सरकारच्या हाती होते. मात्र सरकारने तसे न करनेच पसंत केले. संत रविदास मंदिराला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती. सिकंदर लोधीने दिल्लीतील तुगलकाबाद येथे १५०० च्या काळात हे मंदिर येथे उभारले. आज दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये संत रविदास यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे जनभावनाचा आदर आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी ही दोन कारणे संत रोहिदास मंदिर न तोडण्यास पर्याप्त होती. मात्र तसे झाले नाही.
हीच बाब आता भोन स्तुपाबाबत होत आहे. मुळात हे स्तुप मौर्यकालीन असल्याने त्याचे संवर्धन करणे हे पुरातत्व विभागाचे आणि सरकारचे कर्तव्यच आहे. पण याबाबत सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने आश्चर्य वाटत आहे. परिणामी आता स्थानिकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. भोन स्तुपाच्या संरक्षणासाठी यापूर्वीही आंदोलने झाली. मात्र मागील दोन महिन्यांत आंदोलनाची धार तीव्र झाली. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या बॅनरखाली आंदोलनाची रुपरेषा ठरली आहे. सप्टंेबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वाशिममध्ये धरणे आंदोलन झाले. बुलढाण्यात ठिकठिकाणी मोर्चे निघाले आणि टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र होत चालले आहे. बुधवारी (१८ सप्टेंबर २०१९) शेगावमध्ये राज्यस्तरीय संमेलन झाले. यामध्ये बौद्ध भिक्खुंच्या उपस्थितीत हजारो स्तुप समर्थकांनी मेळाव्यात हजेरी लावली आणि सरकारने गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली. भोन स्तुप वाचवण्याचा लढा तीव्र झाला असून थेट उत्तरप्रदेशमधूनही लढ्यात आंदोलक सहभागी होत आहेत. हा लढा यशस्वी होईल की नाही हा येणारा काळ ठरवेल. पण  ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.

Thursday, 11 July 2019

Learn Pali ‘पालि शिका, धम्म जाणा’

‘धम्म हवे रक्खन्ति धम्मचारि’ अर्थात जो धम्माचे आचरण करतो, त्याचे धम्म रक्षण करत असतो. पण धम्माचे आचारण करणे म्हणजे नेमके काय? या प्रश्नाचे उत्तर बुद्धांनी अनेक सुत्तांमधून दिले आहे. या जगात प्रत्येकाला काही ना काही दुक्ख आहे, आणि प्रत्येकाच्या दुक्खाचे निवारण करण्याचा मार्ग बुद्धांकडे आहे. पण बुद्धांपर्यंत पोहचायचे कसे? तर त्याचे सोपे उत्तर आहे, बुद्धांनी दिलेल्या उपदेशांमधून होय. बुद्धांचे सर्व उपदेश हे पालि भाषेमध्ये आहेत. त्यामुळे हे उत्तर शोधणे तितके सोपे नाही. कारण ही भाषा आज वापरात नाही. त्यामुळे धम्म जाणून घ्यायचा असले, तर प्रत्येकाला पालि भाषा येणे गरजेचे आहे.
बुद्धांचा धम्म जाणून घ्यायचा असेल तर पालि भाषा येणे तितके गरजेचे आहे का? कारण अनेक विद्वानांनी बुद्धांनी दिलेले काही सुत्त मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये भाषांतर केलेले आहेत. पण भाषांतर झालेल्या उपदेशांना परिपूर्ण म्हणावे का? तर उत्तर आहे नाही, कारण पालि भाषेच्या तोडीस जगाच्या पाठिवर अशी कोणतीच भाषा नाही, जी बुद्धवचनाला न्याय देऊ शकेल. कारण बुद्धांनी पालि भाषेत दिलेली सुत्त तंतोतंत भाषांतर करणे कठिण काम आहे.  उदा, ‘मेत्ता’ शब्दाचे जेव्हा मराठीत भाषांतर होते, तेव्हा सर्रास त्याला मैत्री संबोधले जाते. पण मराठीमध्ये मैत्री म्हणजे व्यक्तींव्यक्तींमधील आनंदपूर्ण व्यवहार होय. येथे एकमेकांमप्रती आसक्ती अभिप्रेत असते. परंतु, मेत्ता म्हणजे पृथ्वीतलावरील सर्व जीवमात्रांचे मंगल व्हावे, ही भावना मनामध्ये कोणतीही आसक्ती न ठेवता बाळगणे. त्यामुळे जेव्हा पालिचे इतर भाषेमध्ये भाषांतर होत असते, तेव्हा त्यातील मर्म निघून जातो.
अस्सद्धो अकतञ्‍ञू च, सन्धिच्छेदो च यो नरो।
हतावकासो वन्तासो, स वे उत्तमपोरिसो॥
धम्मपदातील अरहंतवग्गामधील ही गाथ आहे. येथे बुद्ध जो अश्रद्धावान आहे, त्याला उत्तम पुरुष म्हणत असल्याचे म्हटले आहे. परंतु, येथे अश्रद्धावान म्हणजे चिकित्सक वृत्तीचा अर्थ अभिप्रेत आहे. ही गाथा बुद्धांनी सारिपुत्तच्या संदर्भात म्हटली असून येथे ‘वन्तासो’ हा शब्द अरहंतसाठी समानार्थी शब्दप्रयोग आला आहे. सन्धिच्छेदो अर्थात त्यांनी आता पुन्हा जन्म घेण्याचा छेद केला आहे. असे जे बारकावे आहेत, ते पालि शिकल्याशिवाय येत नाहीत.
मग ही भाषा कोठे शिकायला मिळणार? हा देखील एक प्रश्नच आहे. कारण आपल्याकडे अशी संस्था किंवा संघटना नाहीच की जे पालिचे ज्ञान देऊ शकेल. पण असे नाही. मुंबई विद्यापीठातील पालि विभाग यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.     
मुंबई विद्यापीठात पालि विभागाची स्थापना होऊन आज १२ वर्षे झाली आहेत आणि या विभागाच्या माध्यमातून पालिचे सर्वांगिण ज्ञान देण्याचे अविरत कार्य सुरु आहे. विशेष म्हणजे पालि विभागात विद्यार्थ्यांना शिकवणारे सर्व ऑक्स्फर्ड विद्यापीठाकडून प्रशिक्षित झालेले शिक्षकवर्ग आहेत. पालि विभागाच्या वाचनालयात सुमारे २ हजारांहून अधिक पुस्तकांचा भरणा आहे. विपस्सना रिसर्च इन्स्टि्युट आवृत्तीचे संपूर्ण तिपिटक, नालंदा आवृत्तीचे तिपिटक, मूळ पालि आणि हिंदी भाषांतर, मूळ पालि आणि मराठी भाषांतर तसेच मूळ पालि आणि इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहेत. विविध शब्दकोष, पुरातत्व विभागाचे अहवाल, ब्रिटिशकालीन पुरातत्व विभागाने केलेल्या अहवालांची प्रत आणि असे बरेच काही पालि विभागाकडे संग्रहित असून अभ्यासू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पालि विभाग म्हणजे ज्ञानाचा भंडारच आहे.
पालि विभागात केवळ अॅकॅडमीक शिक्षणावर भर दिला जात नाही, तर विद्यार्थ्यांकडून अनेक उपक्रमही करूवून घेतले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. विभागामध्ये प्रत्येक पोर्णिमेला धातूपूजा घेतली जाते. या धातुपूजेवळी एक वेगळेच वलय निर्माण होत असते. सुमारे दीड तास चालणाऱ्या पूजादरम्यान विपस्सना करतानाचाही अनुभव निराळाच असतो, जो शब्दांमध्ये माडणे शक्य नाही.
सामाजिक बांधिलकीचेही उपक्रम पालि विभागाच्या विद्यार्थ्यांकडून होत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी सलग १२ तास अभ्यासिका राबवून खऱ्या अर्थाने पालि विभागात बाबासाहेबांची जयंती साजरी होत असते. तर बाबासाहेबांच्या महापरिनिब्बाणादिवशी देखील चैत्यभूमीवर पालि विभागाचे विद्यार्थी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सेवेसाठी तत्पर असतात. आजपर्यंत कोणत्याही संस्था अथवा संघटनेने काम केले नाही, असे काम पालि विभागाचे विद्यार्थी येथे करत असतात. येथील येणाऱ्या प्रत्येकाकडून एक सर्व्हे फॉर्म भरवून घेतला जातो. या फॉर्मच्या माध्यमातून समाजामध्ये किती जनजागृती झाली आहे, शिक्षणाचा दर्जा कुठे आहे इत्यादी सर्व माहिती उपलब्ध होते आणि येथे येणाऱ्यांना पालि भाषा शिकवण्यासाठी प्रेरित केले जाते. 
पालि विभागातील विद्यार्थ्यांसाठी दर वर्षी किंबहुना वर्षातून दोन वेळा अभ्यासदौरा आयोजित केला जातो. बौद्धकालीन ऐतिकासिक स्थळांना भेटी देऊन त्या स्थळांची इतंभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते. या स्थळांचा अभ्यास कसा करायचा? एखाद्या लेणीवर अथवा बौद्धकालीन ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर नेमके काय पाहायचे, याचे ज्ञान या अभ्यासदौऱ्यातून होत असते.
१४ ऑक्टोबर, धम्मदिक्षा दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर राईटींग अॅण्ड स्पिचेस या गंथ्रावर आधारित दोन दिवसीय पोस्टर सादरीकरण कार्यक्रम आखला जातो. बाबासाहेबांच्या लिखाणाचा संदर्भ घेत कलात्मक पोस्टर प्रदर्शन आणि सादरीकरण या दिवशी होत असते. मुंबईत अशी कोठेच साजरी होत नाही, इतकी भव्यदिव्य बुद्धपोर्णिमा पालि विभागात साजरी केली जाते. तीन ते चार दिवसीय विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आशियाई बौद्ध राष्ट्रांमध्ये ज्याप्रमाणे बुद्ध पोर्णिमा साजरी होते, त्या तोडीस येथे समारंभ आयोजित केला जातो आणि कार्यक्रमाच्या शेवटी विद्यापीठाचा परिसर असंख्य दिव्यांनी खुलून दिसतो. विद्यार्थ्यांद्वारे येथे दिवे लावले जातात आणि बुद्ध पोर्णिमा कार्यक्रमाचा समारोप होतो.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना मिळावी, विद्यार्थ्यांना शोधनिबंध सादर करण्याची वेळोवेळी संधी दिली जाते. वर्षभरामध्ये असे अनेक उपक्रम हाती घेतले जातात, जे विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वृद्धिगत करतात.
सध्या पालि विभागामध्ये दहावी, बारावीनंतर बी.ए., तर पदवीनंतर एम. ए., तसेच पोस्ट ग्रॅज्युएट अॅडव्हान्स डिप्लोमा, एम.फिल, पीएचडी इत्यादी उच्च शिक्षणाचे कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सोईस्कर पडले, अशी वेळरचना करण्यात आलेली आहे. सोबतच ज्यांची दहावी झाली आहे किंवा बारावी झाली आहे, त्यांच्यासाठी एक वर्षीय प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. यामध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा इन बुद्धिस्ट स्टडिज, विपस्सना थेरी अॅण्ड प्रॅक्टिस, परियत्ती अॅण्ड पतिपत्ती असे विविध कोर्सेस उपलब्ध आहे. ज्यांची कलेमध्ये आवड आहे, त्यांच्यासाठीही आर्ट अॅण्ड कल्चर डिप्लोमा कोर्स उपलब्घ आहे. दरवर्षी दोन दिवसीय ब्राम्ही लिपी कार्यशाळा होत असते. त्यामुळे येथे केवळ पालिचेच ज्ञान मिळत नाही, तर सर्वांगिण ज्ञान मिळत असते. त्यामुळे शुद्ध स्वरुपात धम्म जाणून घ्यायचा असेल, तर मुंबई विद्यापीठ,पालि विभाग एक उत्तम पर्याय आहे. जोपर्यंत पालि भाषा अवगत होणार नाही, तापर्यंत धम्म समजणे अवघडच आहे. डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते भारत बौद्धमय करण्याचे, पण हे स्वप्न पालि शिकण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून वेळ न दवडता ज्यांना बुद्धांचा धम्म जाणून घ्यायचा आहे, त्यांनी पालि विभागामध्ये आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा आणि आत्म कल्याणासह इतरांच्या कल्याण साधण्यास पुढाकार घ्यावा.  ज्यांना ज्ञानाच्या कक्षा रुंदावयाच्या आहेत, त्यांचे पालि विभागातर्फे नेहमीच स्वागत आहे. 

Wednesday, 3 July 2019

‘गिरिलिंग लेणी’

भारतात सुमारे १५०० लेण्या असून सर्वाधिक लेण्या या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राला लेण्या साकारण्यासाठी पोषक पठार लाभल्याने येथे सर्वाधिक लेण्या आढळतात. सुमारे १२०० लेण्या महाराष्ट्रात असून त्यापैकी १ हजार लेण्या या बौद्ध लेण्या आहेत. महारा

ष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक लेण्या कोरल्याचे आढळते. त्यापैकीच एक लेणी सांगली जिल्ह्यात आढळते. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे गिरिलिंग म्हणून येथे लेणी ओळखली जाते. दक्षिण पूर्व दिशेला ही लेणी आहे. वज्रयान काळातील ही लेणी असल्यामुळे येथे कोरीव काम दिसून येत नाही.
पश्चिम महाराष्ट्रात एकेकाळी वज्रयान बुद्धिझमचे चांगल प्रस्त होते. येथे मोठ्या प्रमाणावर वज्रयान बुद्धिझमचे अनुयायी होते. वज्रयान बुद्धिझममध्ये स्तुपाचा आकार बदलून छोटा झालेला होता. कर्जत तालुक्यातील कोंडाणे लेणी ही साधारण दुसऱ्या शतकामध्ये साकारलेली होती. यामध्ये स्तुपाची विभाजनी मेदी, अण्ड, हर्मिका, छत्री अशा भागात आहे. तर सांगलीतील गिरिलिंग लेणी ही सातव्या शतकामध्ये कोरली गेली असल्याचे त्याच्या वास्तुकलेवरून स्पष्ट होते. भारतात सातव्या शतकामध्ये वज्रयान बुद्धिझमचा प्रभाव होता. त्यामुळे ही वज्रयान बुद्धिझमचे प्रतिनिधित्व करणारी लेणी आहे.  येथे स्तुपाचा आकार तुलनेत छोटा आहे. याला वोटीव स्तुप असे म्हणतात. बहुतांशी अभ्यासक वोटीव स्तुप हे शिवलिंग असल्याची गल्लत करतात, परंतु, ते तसे नाही. वज्रयान बुद्धिझमचे हे एक प्रतिक आहे. दिसण्यास सामर्ध्य असले तरीही दोन्हीमधील वास्तुरचनेतील तफावत हे सिद्ध करते की हे वोटीव स्तुप आहे. चीन, तिबेट, भुतान या इस्ट एशियामध्ये वज्रयान बुद्धिझमला फॉलो करणारे अनुयायी आजही आहेत. वोटीव स्तुप घारापूरी लेणीमध्येही आढळते. त्याचप्रमाणे छत्तीसगडच्या सिरपूरमध्ये झालेल्या उत्खनानातूनही वोटीव स्तुप सापडले आहे. आज हे स्तुप छत्तीसगड पर्यटन विभागाने संरक्षित केले आहे. परंतु, याला वोटीव स्तुप आहे, अशी मान्यता मात्र दिलेली नाही.  
 सांगलीतील ही लेणी वज्रयान बुद्धिझमच्या काळातील आहे.  दक्षिण पूर्वच्या दिशेने ही लेणी आहे. येथे फ्लोअरवर भुसभुशीत माती आढळते. सर्वसाधारणपणे लेण्याच्या फ्लोअरवर दगड सापडतो, पण येथे भुसभुशीत माती दिसून येते. फारस पद्धतीचा दगड येथे आढळत असल्यामुळे येथे दगडाची झिज होऊन ही माती झाली असावी बहुतेक. या लेणीमधील दगडाचीही प्रत तशी हलकीच आहे. तसेच लेणी बांधताना लाकडाचा वापर झाल्याचे दिसून येते. दगडाची प्रत हलकी असल्यामुळे येथे अतिरिक्त कामे झाल्याचे दिसून येत नाही. कालांतराने या लेणीचा विकास मागे पडला असावा. या लेणीमध्ये एक ‘कोटक’ (विपस्सना करण्यासाठीची छोटी खोली) दिसून येते. तर आणखी एक कोटक बांधण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते. पण दगडाची प्रत चांगली न लागल्यामुळे दुसरे कोटक कोरण्यात आले नाही. सर्वसाधारणपणे लेण्यांमध्ये पोदी आणि कोदी आढळतात. पोदी म्हणजे पिण्यासाठी पाणी साठवणूक करण्याची जागा आणि कोदी म्हणजे वापरण्यास योग्य पाण्याची साठवणूक करण्याची जागा. येथे या दोन्ही गोष्टी आढळत नाहीत. त्यामुळे येथे भिक्खुंचे चिरकाळ वास्तव्य राहिले असेल की नाही, हे प्रश्नांकीत आहे. या लेणीमध्ये पिलास्टर देखील आहे. पिलास्टर म्हणजे असा खांबा जो लेणीशी संलग्न असतो. अर्थात लेणीच्या अगदी जोडून असणाऱ्या खांबाला पिलास्टर म्हणतात. प्रत्येक खांबाची रुंदी ही २.५ इंच असून कोटकची आहे. तर लेणीचा आकारमान २०.७ फुट रुंदी आणि २७ फुट लांबी असा आहे. चेत्यगृहासमान हे बांधकाम असून परंतु, याला चैत्यगृह म्हटले जात नाही. कारण येथे चैत्य किंवा मूर्ती दिसत नाही. अशाच पद्धतीचे वास्तुशिल्प गुजरातमध्येही काही ठिकाणी आढहळे. या लेणीवरून महाराष्ट्रात बौद्धधम्म चांगल्या प्रकारे वाढलेला, विस्तारलेला आणि विकसित झाल्याचे समजून येते. 





Friday, 8 February 2019

प्राच्यविद्यामध्ये शब्दांचे फटकारे अन् कौतुक

दर दोन वर्षांनी भरवली जाणारी बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषद नुकतीच सांगली येथील प्रसिद्ध विलिंग्डन महाविद्यालयात पार पडली. औपचारिक उद्घाटनानंतर ‘प्राच्यविद्या’ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पूर्वी युरोपमध्ये ऑरिएन्टल काँग्रेस संकल्पना अस्तित्वात होती. साधारण १८७० च्या दरम्यान मध्य युरोपपासून जपानच्या संस्कृतीच अभ्यास करण्याची संकल्पना दृढ झाली. विस्तीर्ण स्वरुपात विस्तारलेल्या भूभागाच्या सार्वंगिक अभ्यास करण्याच्या हेतूने सुरु झालेल्या या परिषदेत नवीन उदयास येणाऱ्या आधुनिक युगाचा उहापोह होत असे. मग अशीच परिषद आपल्याकडे का नाही? आपल्या संस्कृतीची कवाडे जगभरासाठी का खुली करू नयेत? या उदात्त हेतूने १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. आज २०१९ मध्ये या परिषदेचे १३ वे अधिवेशन सांगलीत पार पडले. 

‘प्राच्यविद्या’च्या नावावरूनच ही संस्कृत भाषेशी निगडीत परिषद असावी, असा बोध होतो. वस्तुत: हे खरेही आहे. कारण या परिषदेत संस्कृत भाषेला आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न झाला. परिषदेच्या उद्घाटनावेळी जरी आयोजकांनी प्राच्यविद्या परिषद ही केवळ संस्कृत भाषा आणि हिंदू धर्माशी निगडीत नसून ही यामध्ये इतर भाषा, धर्मांतील अभ्यासकांसाठी दरवाजे मोकळे आहेत, असे स्पष्ट केले होते. परंतु, जसजशी परिषद पूढे जात होती आणि वेद-पुराणांची दाखले देऊन ज्याप्रमाणे विषय सादर होत होते, यावरून ही परिषद संस्कृत भाषेच्या जवळीचच वाटली. असो.. असे असले तरीही या परिषदचे कवाड सर्वांसाठी मोकळे आहे, हे पालि भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागावरून दिसून आले. या परिषदेत तब्बल १४५ शोधनिबंधांची नोंदणी झाली होती. त्यापैकी जवळपास १३५ शोधनिबंध सादर झाले. या १३५ शोधनिबंधांपैकी तब्बल ४५ शोधनिबंध एकट्या मुंबई विद्यापीठातील पालि भाषा विभागातून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे होते. हा आकडा निश्चितच अभिनंदनीय आहे. त्यामुळेच आयोजकांनाही पालि भाषेतून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. यंदाचे हे १३ वे अधिवेशन होते आणि सातत्याने मुंबई विद्यापीठाच्या पालि विभागातील विद्यार्थी या प्राच्यविद्या परिषदेत सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे उद्घाटनावेळीच परिषदेचे सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांना या विभागातील विद्यार्थ्यांचे गोडवे गायले. तर परिषदेचे सहसचिव श्रीनन्द लक्ष्मण बापट यांनीही समारोपावेळी पालि विभागाच्या विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे कौतुक केले. पालि विभागाच्या विद्यार्थ्यांचे शोधनिबंधही त्याच तोडीचे होते. ‘बाला च पण्डिता च’ अर्थात ‘मुर्ख आणि पण्डित’, ‘सम्मावाचा’, ‘वृद्धाश्रमांची गरजच काय?’, ‘मैत्ता’ अर्थात मैत्री भावना, ‘कार्ला लेण्यांवरील शिलालेख’ असे विविध विषय या परिषदेत हाताळण्यात आले आणि हे सर्व विषय वाखणण्याजोगे होते. विषयांची मांडणी, प्रेक्षागृहातून आलेले प्रश्न, त्यावर उत्तर, उत्तरातून निर्माण झालेला प्रतिप्रश्न हे सर्व पाहण्यासारखे होते.
संस्कृत भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही पूर्ण क्षमतेने विषय सादर केले. नवख्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण पाहण्यासारखे होते. श्लोकांचे स्पष्ट उच्चार, विषयांची मांडणी आणि निष्कर्षापर्यंत येत विषयाचा शेवट आणि त्यानंतर विचारलेला प्रश्नांना सडेतोड उत्तरे, हे सर्व वातावरण अल्हाददायक होते. खतं एवढीच की जर या विद्यार्थ्यांनी आपल्या विषयाला न्याय देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली असती तर परिषद आणखी खुलून दिसली असती. संस्कृतच्या अनेक विद्यार्थ्यांनी विषय तर सादर केले, पण ते तडीस नेताना अडकले. विशेषत: धर्म आणि तत्त्वज्ञान विभागात सादर झालेल्या विषयांमध्ये तर्काचा अभाव प्रकर्षाने दिसून आला. उदाहरण सांगायचे झालेच तर, एका विद्यार्थ्याने ‘व्यक्तिमत्व विकास’ विषय सादर करत असताना सध्याचे ‘सॉरी, ओके, थॅक्स’ या स्मार्ट शिष्टाचाराऐवजी संस्कृत साहित्यात जे ‘पंचयज्ञ’ सांगितले आहेत, ते करावे. जेणेकरून व्यक्तीमत्वाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. पण त्यांच्या विषयात तर्काचाच अभाव जाणवला. त्यामुळे मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्या विद्यार्थ्याला अवघडल्यासारखे वाटले. तर अभिजात साहित्यात ‘योगपीठासन स्तोत्र’ सादर करणाऱ्या विद्यार्थ्याला मनशुद्धीचे मॅकॅनिझम विचारले असता तो विद्यार्थी निरुत्तर झाला. एकंदर वाद-संवाद घडत असताना कुठेही द्वेषाचे वलय नव्हते. अर्थात उद्घाटन कार्यक्रमाचा ‘ते’ भाषण सोडले तर सर्व काही खेळीमेळीत चालले. अर्थात येथे ‘त्या’ भाषणाचा उल्लेख करतच नाही, कारण ते अर्थहिन होते. सादर करणारे विद्यार्थी आणि त्यांना प्रश्न विचारणारे मातब्बर यांची जुगलबंदी पाहण्यासारखी होती. परिषद अगदी शिस्तबद्ध आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. परिषदेच्या निमित्ताने सांगलीच्या स्थानिक इतिहासाची ओळख देखील झाली. तर्कशुद्ध आणि आध्यात्मिक जोड असणारे निबंध सादर होत असताना त्यावर साधकबाधक चर्चा झाली. मतांचे खंडण झाले. चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलेल्या शोधनिबंधनांना शब्दांचे फटकारे बसले. आणि आपल्या गुणकौशल्याने सादर केलेल्या विषयांचे कौतुकही झाले.  

Sunday, 28 January 2018

‘मूलभूत कर्तव्य आणि मी’

‘आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी कटीबद्ध आहोत’, या संविधानाच्या प्रास्ताविकेतील पहिल्या ओळी केवळ पुस्तकापुरत्याच मर्यादित राहिल्यासारखे वाटते. कारण या गोष्टींची पुर्तता करण्यासाठी संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी होतानाच कुठे दिसत नाही. मूलभूत हक्कांसाठी आवाज उठवणारा भारतीय मूलभूत कर्तव्यांपासून मात्र दूर पळतो. नितीमत्ता, शील धुळीस मिळाल्यामुळेच की काय, सरकारला ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक कल्याण व संरक्षण कायदा २००७’ बनवावा लागतो. न्यायव्यवस्थेला अशा प्रकारच्या कायद्याची अंमलबाजवणी करावी लागते, हीच भारतीयांसाठी दुर्देवाची बाब आहेे. ज्या भारतात सुसंस्कृतीचे बीजारोपण झाले, तेथील नितीमुल्यांचा ऱ्हास होत चालला आहे, हे मोठे दुर्देव. मग त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांची जाणीव तरी कोठून येणार? हा संधोशनाचा मुद्दा आहे. आज 69 वा प्रजासत्ताक दिन. हा राष्ट्रीय उत्सव साजरा करत असताना मुलभूत कर्तव्यांची उजळणी होणे गरजेचे आहे.
नववर्ष भारतीयांसाठी नवीन आशा घेऊन येणार आहे, तसा अहवाल देखील जागतिक बँकेने दिला आहे. परंतु, नववर्षाच्या सुरुवातीपासून भारतीय नागरिक म्हणवून घेणाऱ्यांना ‘सामाजिक’ ग्रहण लागले. राज्यासाठी नवीन वर्षाची सुरुवात काही चांगली राहिली नाही. भीमा-काेरेगावच्या निमित्ताने समाजकंटकांनी पुरोगामी महाराष्ट्राला बट्टा लावला. याचे परिणाम सर्वांना भोगावे लागले. भीमा कोरेगावची दंगल फार भयाण होती. प्रसारमाध्यमांमधून जर त्याचे चित्रण झाले असते, तर राज्याची राखरोंगाळी होण्यास वेळ लागला नसता, पण हे चित्रण झाले नाही, तेच चांगले झाले. पण ‘एकीकडे खड्डा पडल्यास दुसरीकडे मातीचा ढिगारा हा होतोच’, या भौतिकशास्त्राच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या दिवशीच २ जानेवारीला राज्यभरात त्याच्या तीव्र आणि विद्रोही प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर जर प्रकाश आंबेडकर यांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली नसती, तर राज्यात तुफान जाळपोळ, हाणामारीच्या घटना घडल्या असत्या, हे सत्य नाकारुन चालणार नाही. ‘बंद’ पुकारणे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतु, संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्याची जाणीव या बंददरम्यानही ठेवली असती तर हा बंद अधिक प्रभावी ठरला असता. भीमा कोरेगावमध्ये जाणूनबुजन तोडफोड झाली, मारहाण झाली. याचे प्रतिउत्तर म्हणून भावनाविवश होत शासकीय संपत्तीचे दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी नुकसान झाले. हे मात्र अपेक्षित नव्हते. ‘खुन का बदला खुन’ हे संविधानविरोधी आहे, हे विसरुन चालणार नाही. संविधानाने कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक भारतीयाला बहाल केले आहे. त्यानुसार व्यक्त होण्यासाठी सर्वजण स्वतंत्र आहेत. त्याच आधारावर मोर्चा, बंद, आंदोलन पुकारले जातात. परंतु, मुलभूत अधिकारचा दुसरा टप्पा म्हणजे मूलभूत कर्तव्यांकडे कोणीही गांर्भीयाने पाहत नाही. कलम ५१ ‘ए’चा (मूलभूत कर्तव्यांचा) आंदोलनादरम्यान हेतुपरस्सर विसर पडतो. राष्ट्रीय बोधचिन्हांचा सन्मान, स्वातंत्रसैनिकांचा सन्मान, सार्वभौमत्व, ऐक्य आणि अखंडतेचे रक्षण, देशाला गरज असल्यास सेवा देण्याची तयारी, जात-धर्म-पंथ भेद विसरुन बंधूभाव वाढवणे, समिश्र संस्कृतीचा आदर करुन त्याचे जतन करणे, नद्या, पर्वत, नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन, वैज्ञानिक मनोवृत्ती विकसित करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, पाल्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे इत्यादी मूलभूत कर्तव्य बजावण्याचे निर्देशच संविधानाने प्रत्येक भारतीयांना दिले आहेत. या मूलभूत कर्तव्यांवर बारकाईन नजर मारल्यास देशातील जी मनं जाती-धर्मांत विभागली आहेत, त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न संविधानाचा हाेता आणि आहे. पंरतु, दुर्देवाने प्रजासत्ताकाच्या इतक्या वर्षांतही वैविध्यतेने नटलेला भारत सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या एक होऊ शकलेला नाही. केवळ ‘विरोध’ करायचा हेच एकमेव आद्यकर्तव्य उरल्यामुळे देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेलाही फाट्यावर मारण्यास भारतीय कुठे कमी पडत नाही. हे ‘पद्मावत’ चित्रपटावरुन दिसून आले. ‘पद्मावत’ चित्रपट ऐतिहासिक घडामोडींवर आधारीत आहे. यावरुन राज्यासह देशभरात गोंधळ माजला. प्रकरण सर्वाेच्च न्यायालयापर्यंत गाजले. सरतेशेवटी आक्षेपार्ह बदल सूचवत चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. पण तरीही तथाकथित संस्कृती रक्षण करणाऱ्यांकडून विरोधाची धार काही कमी झालेली दिसत नाही. आपण भारताला महासत्ता म्हणून बघण्याची स्वप्ने रंगवत आहोत. पण मनामधील क्लेश धुवून टाकण्यात कोणालाच सौरास्य नाही. किंबहुना कलम ५१ ‘ए’ची ओळख म्हणा किंवा जाणीव, हरवली आहे. सामाजिक सलोखा जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने लोकशाहीत वावरत आहोत, हे म्हणणे वावगे ठरेल. सामाजिक सलोखा साधण्याची शिकवण ही शालेय स्तरावरुन रुजवली पाहिजे. ज्याप्रमाणे चौथीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा बालवयातच शिकवून स्वराज्याभिमान मनात रुजवला जातो. प्रार्थनावेळी ‘जन गण मन’, ‘वंदे मातरम्ा्’ गाऊन देशाभिमान रुजवला जातो, तसेच शालेत दररोज मूलभूत कर्तव्यांची उजळणी होणेही तितकेच गरजेचे आहे. आपले अधिकार काय आहेत? हे कोणालाही सांगावे लागत नाहीत, ते आपसुकच कळते, परंतु, आपले कर्तव्य काय आहेत, हे मात्र ठासून सतत सतत बिंबवावे लागते. तेव्हाच ती अंगवळणी पडते. संविधानाने ठरविलेल्या अकरा मूलभूत कर्तव्यांची जाणीव झाल्याखेरीस ‘हा माझा देश आहे’, या भावनेला बळ मिळणार नाही. त्यासाठी ‘माझी ओळख, मी भारतीय’ होणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा भारत विकसनशीलतेकडून विकासाच्या दिशेने आरुढ होईल.

Monday, 14 August 2017

स्वराज्याची ‘दौलत’

भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे झाली. गुलामगिरीच्या प्रदीर्घ दीडशे वर्षांच्या कालावधीत अनेक क्रांतीकारकांच्या स्मृती आज काळाच्या ओघात पुसट झाल्या आहेत. काही विस्मरणातही गेल्या आहेत. परंतु, आजचे स्वातंत्र्य हे त्यांच्या रक्ताची देण आहे. भारताच्या सुवर्ण इतिहासातील ही रत्ने इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवली आहेत. सामाजिक व राजकीय अशा दुहेरी साखळदंडात अडकलेल्या क्रांतीविरांनी ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडले होते. गुलामगिरीच्या नकर पाशातून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी उभारलेल्या लढ्यातील योद्ध्यांना मात्र ब्रिटीशांनी ‘लुटारु’चा स्टॅम्प लावला. ब्रिटीश इंडियातील ‘ठग’ ज्यांनी जुलमी राजवटीविरोधात बंड पुकारला, त्यांना इतिहासात नगण्य स्थान मिळाल्याने स्वातंत्र्यलढ्यातील या नायकांच्या गाथा आज मिटत चालल्या आहेत.
रामोशी एक अशी जमात ज्यांनी नेहमीच क्रांती केली. त्यांची निष्ठा आणि पराक्रम पाहून चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामोशी जमातीतील लोकांना महत्त्वाची जबाबदारी दिली होती. शिवरायांच्या मावळ्यांमध्ये बहुतांशी सैनिक आजच्या एससी, एसटी प्रवर्गातील होते. रामोशींवर विशेष जबाबदारी होती. अफझल खानाचा पडाव, सुरत स्वारी ही रामोशी बहिरजी नाईक आणि त्यांच्या बहाद्दर साथीदारांमुळे फत्ते झाली होती. त्यामुळे रामोशींना किल्लेदारी बहाल झाली. कालांतराने सत्तातरे झाली. ब्रिटीशांनी गडकिल्ल्यांवर मोर्चा वळला. परंतु, पुण्यातील उमाजी नाईकांसारख्या किल्लेदारामुळे त्यांचे गडकिल्ले काबाजी करण्याचे स्वप्न भंगले. अखेर ब्रिटीशांनी रामोशींना लुटारु म्हणून घोषित करत त्यांची धरपकड सुरु केली. हे इतके जुलमी होते की, गर्भातील रामोशी देखील लुटारुच; त्याच्यावरही खटला भरला जात असे. हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतात होत होते. लढवय्या जमातींना लुटारु घोषित करुन त्यांचा बिमोड करण्याचा एककलमी कार्यक्रमच ब्रिटीशांनी आखला होता. 
ब्रिटीशांच्या या जुलमी राजवटीच्या विरोधात पेठून उटलेल्या उमाजींनी संघटन मजबुत करत रक्तरंजीत लढा दिला. १८५७ पूर्वीचा हा उठाव होता. आणि हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर लढा सुरु झाला होता. फरक एवढाच ही तो संघटीत नव्हता. बिहारच्या भागलपूरचे ‘धतुरया’ टोळीचा चतुर सिंग असो, की राजस्थानचे रखवालदार या सर्वांनी ब्रिटीशांविरोधात आवाज उठवला. उमाजी नाईकांनीही अशीच सशस्त्र क्रांती घडवली. पण त्यांचा संर्घष फारकाळ टिकला नाही. ब्रिटीश दस्ताएवजात त्यांना एक दरोडेखोर म्हणून घोषित करत फासावर लटकवले आणि येथून उडालेल्या ठिणगीचा वणवा दौलतराव नाईकाच्या रुपाने भडकू लागला. उमाजी नाईक आणि दौलतराव यांच्यातील कालावधी साधारण ५० वर्षांचा. १८३२ मध्ये उमाजींना फासावर चढवले. तर दौलतराव आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडकेंचा उजवा हात. उमाजी नाईकांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याची खुणगाठ मनाशी बांधून दौलतरावांनी रायगड गाठले. जशी शिवाजी-तानाजीची जोडी, तशी वासुदेव-दाैलतराव यांची. फडकेंच्या भेटीपूर्वीच दौलतरावांनी ब्रिटीशांच्या नाकीनऊ आणले होते. ब्रिटीशांचे हस्तक सावकार, जमीनदारांना लुटायचे आणि जे द्रव्य गोळा होईल, ते स्वराज्यकामी आणयचे हे एकच धोरण दौलतरावाने आखले होते आणि रामोशी जमातीतील इतर शूरवीरांना घेऊन एक संघटना बांधली होती. फडकेही अशाच क्रांतीकारकांच्या शोधात होते आणि त्यांना स्वराज्याची दौलत सापडली. फडकेंच्या फौजमध्ये रामोशी, महार, मातंग, कोळी, कुणबी, चर्मकार, नाभिक, मराठा आणि मुसलमान अशा विविध जातीधर्मातील क्रांतीवीरांचा समावेश होता. ब्रिटीश राजवटीच्या पायाखालची जमीन सरकवण्यासाठी धनदांगड्यांच्या घरावर दरोडा घालयाचा आणि त्याचा उपयोग स्वातंत्र्यलढ्यासाठी करायचा, हे काम दौलतरावाचे. या कामात मोलाची साथ मिळायची तरी हरी मकाजी नाईक याची. वासुदेव बळवंत फडकेंच्या लढ्यातील शिलेदार हे दोन ‘नाईक’ होते. दौलतरावाचा शेवट लढताना हुतात्म्य पत्कारत झाला झाला तर हरी नाईकाला त्याच्या कुटुंबासह ब्रिटीशांनी १८७९ मध्ये चकमकीत ठार मारले. 
उमाजी नाईकांच्या समकालीन एक असाही नायक होता जो इतिहासाच्या पानांमधून हरवला आहे. त्याचे नाव चतुर सिंग. अर्थात इतिहासात क्रांतीकारी म्हणून याची गणना झाली नसली तरी त्याने ब्रिटीश राजवटीला जेरीस आणले होते. ब्रिटीश व्यवस्था खिळखिळी करण्यासाठी त्यानेही धनदांडग्यांना लुटण्याचा चंग बांधला होता. परंतु, त्याचा लढा रक्तरंजीत नव्हता. ‘धोतरा’ या विषारी गवताच्या फुलांचा वापर करुन जमीनदारांचा विश्वास संपादित करुन त्यांच्यावर विषप्रयोग करायचा आणि त्याची ‘धतुरया’ टोळी सर्व माल लुटायची. मंदिरेही या टोळीने सोडली नव्हती. ब्रिटीश कायद्यात शस्त्रच्या संज्ञेत ‘धोतरा’ नसल्यामुळे नक्की पकडायचे कोणाला? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण चतुर सिंग यांच्याच टोळीतील एका फितुराने घात केल्यामुळे धतुरया टोळी ब्रिटीशांच्या तावडीत सापडली. 
ब्रिटीशांची आर्थिक कुचंबणा करण्यासाठी क्रांतीविरांनी १८०० सालापासूनच सुरुवात केली होती. यात काही पेशेवर ठग होते तर काही स्वराज्याच्या लढ्यासाठी लुटमार करत होते. मद्रास प्रांतात किम सिंग, पुण्यात उमाजी नाईक, बिहारमध्ये चतुर सिंग, झारखंडमध्ये बिरसा मुंडा, पिंडारी जमात आणि अशा अगणीत शुरवीरांनी ब्रिटीश राजवटीला खिळखिळी केली. त्यामुळे ब्रिटीशांनी विल्यम स्लीमनच्या नेतृत्वाखाली ‘ठगांचा’ बंदोबस्त करण्याची एककलमी कार्यक्रम आखला. १८१० पासून जमीनदारांविरोधात जाणाऱ्यांचा बदोबस्त ब्रिटीशांनी लावला. १८२६ ते १८३५ च्या हजारोंच्या संख्येने क्रांतीकारकांना फासावर लटकवले. रामोशींवर तर आईच्या उदरात असतानाच खटले चालवले आणि त्यांना शिक्षा केली. ब्रिटीशांची ही जुलमी राजवट मोडीत काढण्यासाठी उमाजी नाईकांचा आदर्श वासुदेव बळवंत फडकेंनी बंड पुकारला. तत्पूर्वी, १८५७ चा उठाव झाला होता. पण हा श्रीमंतांचा उठाव होता. जमीनीशी सलग्न असलेले किंबहुना जंगलात राहणाऱ्या आदिवासींपैकी बिरसा मुंडाने जमीनदारी व्यवस्थेलाच आव्हान दिले. आदिवासींची आंदोलने उभारली. परंतु, जमीनदारीविरोधात आवाज उठवणे ब्रिटीश शासनाला परवडण्यासारखे नव्हते. परिणामी त्याला तुरुंगवास झाला आणि तुरुंगातच १९९० च्या सुमारास मुंडाने शेवटचा श्वास घेतला. स्वराज्याच्या या ‘दौलती’च्या जोरावर पुढे चाफेकर बंधु, लाला लाजपतराय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस आदींनी क्रांतीची मशाल तेवत ठेवली. त्यामुळे आज स्वांतत्र्याचा प्रकाश चहूबाजूने झळकत आहे. 

Monday, 19 June 2017

bhandardara Kajva Mohotsav MTDC (काजवा महोत्सव )



अवकाळी पावसाच्या ढगांनी आकाशात आपली जागा व्यापताच येथे जमीनीवर जणू चांदण्यांचा सडाच उतरतो. मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागताच काजव्यांची किरकिर रात्रभर सुरु राहते आणि निसर्गप्रेमींची पाऊले आपोआप भंडारदराच्या खोऱ्याच्या दिशेने पडू लागतात. भंडारदरामध्ये काजव्यांचा हा अनोखा चमत्कार पाहणे अलौकिकच असते. पर्यटकांना काजव्यांच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या जैवप्रकाशाचे दर्शन घडविण्याची संधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घडवून आणली आहे. भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये सध्या काजवा महोत्सव सुरु असून हा महोत्सव आपल्या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ इथे अधिकच वाढला आहे. गेल्या मे महिन्याच्या २० तारखेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाची सांगता २० जून रोजी झाली.
‘काजवा’ हा काही आपल्यासाठी नवीन नाही. मग या काजवा महोत्सवात एवढे विशेष काय आहे की पर्यटकांची ही एकच गर्दी भंडारदरामध्ये होत आहे. हे पाहण्यासाठी स्वत: भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये भटकंती केली आणि काजव्यांचा अविस्मरणीय देखावा पाहून नेत्र सुखावले. भंडारदरातील जंगलात जिथे नजर जाईल तिथे काजव्यांची लुकलुक दिसत होती. विशेष म्हणजे, या काजव्यांमध्ये कमालीचे समन्वय पहायवास मिळाले. कि्रकेट मैदानाच्या प्रेक्षक गॅलरीत क्रीडारसिक ज्याप्रमाणे खेळाडूंना आळीपाळीने दाद देतात, अगदी तसाच नजारा इथे पहावयास मिळत होता. एका झाडामागून एका झाडावरील काजव्यांचा जैवप्रकाश चमकत जात होता. हे पाहणे अविस्मरणीय. मुंबईपासून १८५ कि.मी. दूर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे पर्यटकांसाठी अगणीत खजाना दडला आहे. नाशिक-अहमदनगर मार्गे आटगाव - कसारा बुद्रुक - इगतपूरी- शिर्डी सिन्नर घोटी मार्गे भंडारदराला आस्वाद घेण्यासाठी जाणे सोयीस्कर पडते.
‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात शंकर महादेवन ‘मन मंदिरा’चा सूर छेडल्यानंतर जे काजव्यांचे दर्शन घडते, ते साक्षात येथे पहावयास मिळते. किंबहूना चित्रपटापेक्षाही कित्येक पटीने हे दर्शन विलोभनीय आहे. पण काजवे पाहण्यासाठी भंडारदराच का? हा प्रश्न वाचकांना पडणे साहजिकच आहे. कोकण आिण पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना काजवा काही नवीन नाही. एवढेच काय, विदर्भातही काजव्यांचा मेळा भरलेला काही ठिकाणी पहावयास मिळतो. परंतु, भंडारदराची बातच निराळी. इतर ठिकाणी तुरळक संख्येेने काजव्यांचे दर्शन घडते. तर भंडारदरात लाखों, कोटींच्या संख्येने काजव्यांचा सडा पडलेला दिसतो. येथे कजव्यांना पोषक असणाऱ्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काजव्यांची चादरच पसरलेली दिसून येते. खोऱ्यांचे भंडार असल्यामुळेच याला भंडारदार म्हटले गेले आिण खोऱ्यांत खेळती हवा नसल्या कारणामुळे काजव्यांना प्रजननासाठी ही जागा पोषक ठरते. येथे हिरडा, बेहड, सदडा अशी वनौषधी झाडांसह आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत आणि या झाड्यांवरच काजवा टिकाव धरू शकातो. या झाडांची पानं ही काजव्यांचा अन्न असते. त्यामुळे भंडारदरात इतर ठिकाणांच्या तुलनेत काजव्यांचे प्रमाण कित्येक पटीने अधिक असते.
विद्युत दिव्यांची रोषणाई केल्यासमान प्रत्येक झाडांवर काजव्यांचा जैवप्रकाश मन मोहून जातो. मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि पावसाळा सुरु होण्यापूर्वीचे काही दिवस हा कालावधी काजव्यांचा प्रजननाचा काळ असतो. या दिवसांत काजवे मोठ्या संख्येने प्रजननासाठी बाहेर येतात. नर-मादीला आकर्षिक करण्यासाठी आपल्याजवळील नैसर्गिक प्रकाशाने ते एकमेकांना इशारे करतात. त्यांचा एकमेकांना आकर्षिक करण्याचा हा जो काही प्रयत्न असतो, तो अलौकिक असतो. हे पाहण्यासाठी दूरदूरुन पर्यटक भंडारदराच्या खोऱ्यांमध्ये भटकंती करतात आणि अगदी सहजच त्यांना जैवप्रकाशाची चादर टिमटिम करताना दिसून येते. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे चांगली सोय केली आहे. येथील काजव्यांची अफाट संख्या पाहता एमटीडीसीने पर्यटन विकासाच्या दृष्टीने येथे गेल्या चार वर्षापासून काजवा महोत्सव भरविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येथील स्थानिकांशी हातमिळवणी करुन पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीने एक पाऊल पुढे टाकले आहे. एमटीडीसीच्या या निर्णयाचा फायदा येथील स्थानिकांना मिळत आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. भंडारदरा आणि आजूबाजूच्या गावांमध्ये बहुतांशी आदिवासी वस्ती आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही. यांना प्रशिक्षण देऊन ‘गाईड’ म्हणून एमटीडीसीने सेवेत रुजू केले आहे. तर काहींना हॉटेल व्यवसाय टाकण्यासाठी परवानगी देखील दिली आहे. या काजवा महोत्सवाला येथील स्थानिक केशव खाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. किंबहुना त्यांच्यामुळेच हा महोत्सव येथे दरवर्षी भरतो. आजमतीस दरदिवशी सुमारे ४०० ते ६०० पर्यटक येथे भेटी देतात आणि या अलौकिक महोत्सवाचा आनंद घेतात. २० तारखेला हा महोत्सव संपत आहे. याचा अर्थ असा नव्हे की येथे काजव्यांचे दर्शन होणार नाही. जोपर्यंत मुसळधार पाऊस होत नाही, तोपर्यंत काजवे येथे लुकलुक करत राहणारच, यात शंका नाही. शिवाय खोल दऱ्या, मोठेधरण, सरोवर, धबधबे, एतिहासिक किल्ला व पुरातन मंदिर आहेच पर्यटकांना खुणवायला. त्यामुळे तुम्ही कधीही येथे जा, निसर्गाने तुमच्यासाठी नवीन काहीतरी वाढून ठेवले असेल, हे नक्कीच!

Monday, 5 June 2017

रेन वॉटर हार्वेस्टिंग गरजेचे

रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाळी पाण्याची साठवणूक करणे, ही फार पूर्वीपासून चालत आलेली संकल्पना. कचऱ्याचे रुपांतर खतामध्ये करण, हे देखील आपल्यासाठी काही नवीन नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपल्याकडे रुढ झालेल्या संकल्पना आता मात्र विस्मरणात गेल्या आहेत. परिणामी आज ग्लोबल वॉर्मिंगसारखा प्रश्न समोर आला आहे. अवकाळी पाऊस, गारपीठ, दुष्काळ, ओला दुष्काळ असे पर्यावरणाची संबंधित प्रश्नांवर आपली ऊर्जा खर्ची होत आहे. तसे या परिस्िथतीलाही आपणच कारणीभूत आहोत, हे देखील मान्य करावे लागले. ही परिस्थिती भयावह होऊ नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना आखण्याची नितांत गरज आहे. शहरी भागात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही काळाची गरज बनली असून ग्रामीण भागात जल संधारण काळाची गरज बनली आहे.
विविध समाजिक संस्थांमार्फत रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती सुरु आहे. ठाण्यात सुमारे १ हजार हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांनी पावसाळी पाण्याची साठवणूक करण्याची यंत्रणा उभारली आहे. हे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या रक्षणाकडे पडलेले एक इवलेसे पाऊलच म्हणावे.
निसर्गाशी आपले असलेले नाते म्हणजे पर्यावरण होय. माणसाने खूप प्रगती केली. आपण अंतराळापर्यंत पोहचलो आहोत. परंतु, काही मुलभूत गोष्टी अशाही आहेत (हवा, पाणी) ज्यांची आपण निर्मिती नाही करु शकत. त्या निसर्गातूनच मिळवाव्या लागतात. शहरी भागात मुख्यत्वे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे पर्यायी साधनांतून पाण्याची बचत कशी करता येईल, याकडे ठाण्यातील पर्यावरण जनजागृती मंचने लक्ष वेधले. त्यातूनच रेन वॉटर हार्वेस्टिंगची कल्पना पुढे आली. २००३ पासून पावसाळी पाण्याची साठवणूक करण्याच्या विषयाची जनजागृती सुरु झाली आणि अवघ्या तीन वर्षांत मंचच्या या कामाची युनिस्कोने सुद्धा दखल घेतली. त्यामुळे आजमतीस ठाण्यात बहुतांशी सोसायट्यांनी पाण्याची साठवणूक करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. परंतु, पर्यावरणाबाबत दक्ष असणे म्हणजे पाण्याची साठवणूक करणे, एवढेच नसते. हा तर केवळ एक भाग झाला.
आज पर्यावरणासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याचा! मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये डम्पिंग ग्राऊंड हा कळीचा मुद्दा झाला आहे आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न देखील सुरु आहेत. पंरतु, कचऱ्याने काय आताच जन्म घेतला आहे का? पूर्वीही कचरा होताच ना! मग त्याची विल्हेवाट कशी लागत असावी? पूर्वी खेड्यांमध्ये ‘उकीरडा’ नावाचा प्रकार होता. त्यात ग्रामस्थ कचरा टाकत असत आणि कालांतराने त्याचा वापर शेतीसाठी खत म्हणून व्हायचा. अगदी पारंपारकी पद्धतीने बनलेल्या या कचऱ्यामुळे जमिनीचा कसही अबाधित राहायचा. परंतु, आज ‘युरिया’ने जमिनीची प्रतही खलावली आिण उत्पन्नही कमी झाल्याचे दिसून येते. ज्या कारणासाठी उकीरडा ओळखला जात होता, ती संकल्पनाच आज लोप पावली आहे. एकेकाळी जे आपल्या अंगवळणी होते, ते सांगण्यासाठी आज सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुरडा करावा लागत आहे. ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणावर आज कोट्यवधी खर्च होत आहेत. ही प्रगती म्हणावी की अधोगती? निसर्गाशी मानवाचे असलेले नाते म्हणजे पर्यावरण. परंतु, आपण निसर्गापासून दूर लोटलो आहोत. मग पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही तर काय होणार. परिणामी आज निसर्गाचे चक्रही बदललेले दिसते. असह्य उकाडा हे त्याचेच प्रतिक आहे. अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ ही त्याचीच फळे आहेत. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आपल्याला त्याच्या जवळ जावे लागेल. कार्बनडाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण मानव जातीसाठी धोकादायक आहे. या कार्बनचे स्थितीकरण करण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या हे अवाक्याबाहेर असले तरी जितकी जास्त झाडे असतील तितका कार्बन नियंत्रणात राहिल, हे समजायला कोणत्या रॉकेट सायन्सची गरज लागत नाही. हो पण त्यासाठी शाळा मात्र हवी, हे मान्य. आज शाळांमध्येही पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी भिंतीचित्रांच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे. ठाण्यात तर पर्यावरण शाळा देखील आहे. ही एकप्रकारची अचिव्हमेंट म्हणावी. जो झोपलेला आहे, त्याला उठवता येऊ शकते, मात्र ज्याने झोपेचे सांेग घेतले आहे, त्याला उठवता येत नाही, अशी एक म्हण आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीत तर सर्वांनी झोपेचे साेंगच घेतले आहे. त्यांना उठविण्यासाठी मोठ्या धक्क्याची गरज आहे. केवळ जनजागृतीने ही लोकं उठणारी नाहीत. आपण किती पाण्यात आहोत, हे समजावून सांगण्यासाठी, आपल्याला किती धोका आहे, याची जाणीव करुन देण्यासाठी ‘पर्यावरण शाळां’ची आज चौकाचौकांत गरज आहे.

Monday, 27 February 2017

मराठी भाषेची स्थित्यंतरे

उपेक्षित हा शब्द भारतीयांसाठी काही नवीन नाही. गेल्या कित्येक पिढ्यांनी या देशात उपेक्षा सहन केली आहे. पंरतु, स्वातंत्र्यानंतरही येथे साहित्यिकांनाही उपेक्षाची भावना सहन करावी लागते, हे या संपन्न भारताचे दुर्दैवच म्हणावे लागेल. साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. पण तरीही येथे एक असा घटक आहे, ज्यांना या संमेलनात दुय्यम स्थान मिळते. म्हणून त्यांनी स्वत:चे व्यासपीठ उभे करण्याचे ठरविले आहे. त्यांची ही धडपड गेल्या २५ वर्षांपासून सुरु आहे. उर्दूचा पगडा असलेल्या मुस्लिम समाजातही मराठी साहित्यिक निर्माण होऊ पाहत आहेत. त्यांना व्यासपीठ देण्यासाठी मुस्लिम मराठी साहित्य मंडळ प्रयत्नशील आहे.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांची मुलाखत घेतली. येत्या मे महिन्यात १९, २० आणि २१ रोजी अकरावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पनवेलमध्ये संपन्न होणार आहे. शासनाकडून निधी मिळत नसल्यामुळे या साहित्य संमेलनाला वलय प्राप्त नसले तरी मुस्लिम समाजासह उपेक्षित साहित्यिकांसाठी हे हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. यानिमित्ताने डॉ. शेख यांनी मराठी भाषेच्या स्थित्यांतराची सविस्तर माहिती दिली. मराठी भाषेला कोणत्याही एका चौकटीत बसवता येणार नाही. ही कालांतराने विकसित झालेली भ्ााषा आहे आणि  भाषेवर इतर भाषांचा मोठा पगडा पडला आहे. जशी उर्दू विकसित झाली, तशी मराठीही विकास पावत गेलेली भाषा आहे. उर्दु ही लष्कारी भाषा म्हणून ओळखली जायची. अल्लउद्दीन खिल्जीच्या आक्रमणानंतर उर्दू भाषेचा जन्म झाला. खिल्जीच्या सैन्यात कर्नाटक, आध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि हैदराबाद येथील सैनिकांचा मोठ्या प्रमाणावर भरणा होता. प्रत्येक राज्याची बोलीभाषा वेगळी असल्यामुळे या सर्वांच्या बोलीभाषेतून एकरुप होत उर्दुचा विकास पावला. मराठी भाषाही तशीच विकसित पावली. मराठी भाषेवर पाली आणि संस्कृत भाषेचा मोठा पगडा दिसून येतो. मराठीतील बहुतांशी शब्द पालीमधून आले आहेत. हे प्रत्येक भाषेसोबत घडते. इंग्रजीने मराठीचा शब्द ‘लूट’ जशाचा तसा घेतला आहे. तसेच ‘दवाखाना’ हा पारशी शब्द मराठीत आज रुळला आहे. ‘दरवाजा’ हा मूळ शब्द उर्दूतून आला आहे. आज इंग्रजीचा शब्द ‘टेबल’ला मराठीत काय पर्याय आहे? काहीच नाही. ‘मात्र’ हा शब्द हिंदी आिण मराठी या दोन्ही भाषांमध्ये आढळतो. विशेष म्हणजे दोन्ही भाषांमध्ये त्याचा अर्थ हा एकच आहे. ‘पाली’ भाषेतला ‘राग’ आणि मराठीतील ‘राग’ हा थोड्याफार अंतरात भिन्न्ा जाणवतो. ‘पाली’तील ‘रागा’चा अर्थ आसक्ती तर मराठीतील ‘रागा’चा अर्थ क्रोध आिण हा ‘क्रोध’ मुळचा संस्कृत शब्द आहे. तर ‘क्रोधा’ला ‘पाली’त ‘कोधं’ म्हटले जाते. ही आहे भाषेची गंमत! गुजराती भाषा आिण मराठी भाषा जेमतेस सारखीच भासते. बहतांशी गुजराती भाषेतील शब्द हे मराठी आहेत. भाषा ही अशा प्रकारचे विकास पावते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात मराठी भाषेचा लहजा वेगळा होता. संत ज्ञानेश्वरांच्या काळी मराठी वेगळी होती. संत ज्ञानेश्वरांच्या काळातील तत्कालीन मराठी आता संस्कृतप्रमाणे भासते. परंतु, ती संस्कृत नाही. शिवाजी महाराजांच्या मराठीवर पारसी आणि उर्दुचा पगडा होता. ‘फितुर’ हा मूळ मराठी शब्द नाही, परंतु, शिवाजी महाराजांच्या बखरींमध्ये हा सर्रास आढळला जाणार शब्द आहे. पेशवेकालीन मराठीही तशीच थोडी बदललेली जाणवते. त्यानंतर महात्मा ज्योतीराव फुले यांच्या कालखंडातील अर्थात अठराशेच्या शतकात मराठीतील बोलीभाष्ाा आणि आज बोलली जाणारी ‘मराठी’ यामध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसतो. महात्मा फुलेंच्या साहित्यावरुन त्याची प्रचिती येते. महात्मा फुलेंच्या ‘शेतकऱ्यांचा आसुड’ या ग्रंथात ‘आमिष’ ऐवजी ‘मिष’ असा शब्दप्रयोग काही ठिकाणी सापडतो. येथे ‘आ’ हे अक्षर सायलेंट आहे. लिखाणामध्ये म्हणायचे झाले तर अगदी अलीकडे काही शब्द बदलले आहेत. उदाहरणार्थ ‘ह्या’ ची जागा ‘या’ ने घेतली तर ‘यांचे’चे ‘यांच्या’ असा वापर होऊ लागला आहे. अशा प्रकारे मराठी ही विकासित होणारी भाषा आहे. तिला कोणत्याही बंधनात बांधता येत नाही. आपल्याकडे प्रत्येक बारा किलोमीटर अंतरावर मराठी भाषेत फरक जाणवतो. अनेकवळा भाषेवर गावंढळ, शुद्ध असे लेबल लावले जातात. परंतु, डॉ. शेख यांना हे लेबल अमान्य आहेत. विशिष्ट प्रकारे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे, ही जी खुळचट संकल्पना रुजली आहे, ती मुळातच अत्यंत हस्यास्पद आहे. प्रमाण-अप्रमाण असे काहीच नसते. भाषा ही संवाद साधण्याचे माध्यम आहे. निजामशाहीच्या प्रभावाखाली असल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात मराठी भाषेत अनेक उर्दु, हिंदी आिण पारसी शब्द आज दुधात साखरेप्रमाणे मिसळले आहेत. मराठवाड्यात भाड्याच्या घराला सरार्ससपणे ‘किरायाचे घर’ म्हटले जाते.   पश्िचम महाराष्ट्रातील लोकांचा मराठी बोलण्याचा लेहजा वेगळा आहे.  साताऱ्यातील मुस्लिम बांधव मराठी बोलताना अर्ध हिंदीचा सर्रास वापर करतात. त्यामुळे ते चूकीचे मराठी बोलत आहेत, असे म्हणण्यापेक्षा ते ‘खडी बोली’त मराठी बोलत आहे, हे म्हणणे अधिक योग्य ठरेल. व्यक्त होण्यासाठी असलेले माध्यम ‘मराठी’ एवढेच काय ते मानावे. प्रमाण-अप्रमाण, शुद्ध-गांवढळ बाेलून समृद्ध भाषेचा अपमान करु नये.            

Tuesday, 14 February 2017

This Valentine Say....‘लिव्ह ईन’च्या बाधेपासून आम्ही दूरच

पूर्वी विद्यार्थ्यांची ओळख त्यांच्या गुणांवरुन व्हायची. खेळ, कला आणि शिक्षणामध्ये अव्वल असलेला कॉलेजचा हिरो असायचा. मात्र अलीकडच्या काळात ही परिभाषा बदलत गेली. हल्ली मुलींना फिरवणाऱ्याची कॉलेजमध्ये चलती असते. किंबहुना जो मुलींमध्ये जास्त परिचयाचा असतो, तोच त्या ग्रुपचा अॅडमीन असतो. येथे ग्रुप म्हणजे व्हॉट्सअॅप नव्हे बरं का! मित्रांच्या खऱ्याखुऱ्या ग्रुपचा तो म्होरक्या असतो. मुलींना पटविण्यासाठी त्याचा मार्गदर्शक सल्ला मोलाचा ठरतो. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत ‘टाईमपास’ असलेली ‘ती’ जीवनसोबती कधी बनते, हे त्याचेच त्याला कळत नाही. पण अलीकडे रिलेशनशिप लाँग टाईम ठेवण्याचा ट्रेण्डच गायब होताना दिसत आहे. करण जोहरच्या चित्रपटांचा हा परिणाम आहे, असे म्हटले तरी वागवे ठरणार नाही.
अलीकडे प्रेमपटातून निराळेच ‘संबंध’ दाखविण्यात येत आहेत. किंबहूना आजच्या तरुण पिढीचे ते प्रतिबिंबच म्हणावे लागेल. पबमधील डान्स फ्लोअरवर मैत्री होते आणि त्याच रात्री प्रेमाचा ‘अंकूर’ही फुलतो. शहरात मुख्यत्व मेट्रो सिटीमध्ये मुलांमुलींमधील मित्रत्वाचे नाते प्रेमात रुपांतरीत होते, हे काही नवीन नाही. आता तर थेट ‘आय लव्ह यू’ पासून सुरुवात होते. प्रेमाच्या बाबतीत ग्रामीण भागानेही कात टाकली आहे. एकेकाळी ग्रामीण भागात फ्रेन्डशिप देते का? या प्रश्नावरुन प्रेमप्रकरणे फुलत होती. परंतु, येथीलही लाईफ फास्ट झाली आहे. नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या प्रेमपटांमुळे प्रभावित झालेला प्रत्येक तरुण ‘तिला’ कशी बाटलीत उतरवता येईल, यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो. यासाठी ‘त्याच्या’ पेक्षा त्याच्या मित्रांचाच जास्त वाटा असतो. तू हो बोलली नाहीस तर हा वैफल्यग्रस्त होईल... वगैरे, वगैरे. जसा शेतीचा हंगाम असतो, प्राण्यांचा प्रजनन काळ असतो, तसा या तरुणांचाही फेब्रुवारी महिना रोमान्सचा पिरियड असतो. ‘रोझ डे’पासून रोमान्सचा लेक्चर सुरु होतो आणि व्हेलेन्टाईन डे दिवशी समारोप. ‘व्हेलेन्टाईन डे’नंतर ती सध्या काय करते? अशी म्हणायची वेळ येऊ नये, यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. परंतु, खरी गंमत ‘प्रपोझ डे’ला उडते. काल गुलाबाचे फुल देऊन सिग्नल तर दिला खरा, पण आज प्रेमाच्या गाडीचा एक्सलेटर रेटायचा कसा? या विवंचनेतच कॉलेजची पायरी चढायची आणि हिंमत करुन एकद्याचे बोलून टाकायचे. बहुतांशी मुलगीही होच म्हणते आणि तिचा नकार असेल तरी तो होच आहे, ही आमच्या तरुण पिढीची श्रद्धा असल्यामुळे तिच्या नकारामुळे फारसा फरकही पडत नाही. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ उक्तीप्रमाणे चिकाटी सोडायची नाही. आज नाही उद्या हो म्हणणारच; नाहीतर जाणार कोणाकडे? अशी प्रत्येक तरुणाची भावना असते. ‘तिच्या’ हो म्हणण्याच्या आशेवर तिसऱ्या दिवशी चॉकलेट देऊन पुन्हा तिला गटविण्याचा प्रयत्न सुरु हाेतो. तसे प्रत्येकाची वेगवेगळी ‘आयटम’ ठरलेली असते, त्यामुळे कोणीही एकमेकांच्यामध्ये लुडबुड करत नाही. फार फार तर मैति्रणी काय त्या मदत करतात, एवढेचं. पण मैत्रिणींची मदतच मोलाची ठरते. कारण हे मित्र साले स्वत:ची पोळी तळण्यासाठी टपलेलेच असतात आणि दुसरे म्हणजे एक मुलगी शिफारस करत असल्यामुळे ‘तिचे’ मन पलटण्यासाठी ते फार उपयोगी ठरते. ‘लोहा गरम’ झाल्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवशी थोडासा खर्च करायचा आणि व्हेलंटाईन डे मग आपलाच की राव! या ‘कष्टा’ची जाणीव कदाचित गर्भ श्रीमंतांच्या मुलांना नसावी. त्यांचं काय, पार्टीमध्ये एखादी भेटली की ड्रिंक घेता घेता ‘सेट’ होते. दुसऱ्या दिवशी ‘तिची’ही उतरते आणि ‘त्याची’ही. काही वेळ त्यांचे हे रिलेशन खुप काळ चालते. प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते. मध्य असतो आणि शेवटही असतो. कोणतेही नातेसंबंध टिकविण्यासाठी या तीन पायऱ्या चढाव्याच लागतात. कॉलेजमध्ये हसण्या-खेळण्याच्या वयात झालेले प्रेम फुलत जाते. एलआयसीचे हप्ते भरल्यानंतर जशी पॉलिसी मॅच्युर होते, तसे प्रेमही प्रगल्भ होत जाते. शेवटचे वर्ष येईपर्यंत दोघांमध्येही सुसंवाद वाढलेला असतो. करिअरनंतर लग्नाच्या गोष्ठी ठरलेल्या असतात. त्यांनतर फॅमिली प्लॅनिंग आिण पुढील आयुष्य. असा या व्हेलंटाईनचा शेवट होतो़  निदान मध्यमवर्गीयांमध्येही हिच प्रथा सुरु आहे. कर्मधर्मसंयोगाने ‘लिव्ह ईन’ची बाधा सध्याच्या मध्यमवर्गीय तरुणांना झालेली नाही, हे पाहून नक्कीच आनंद होतो.