भारतात सुमारे १५०० लेण्या असून सर्वाधिक लेण्या या महाराष्ट्रात
आहेत. महाराष्ट्राला लेण्या साकारण्यासाठी पोषक पठार लाभल्याने येथे सर्वाधिक
लेण्या आढळतात. सुमारे १२०० लेण्या महाराष्ट्रात असून त्यापैकी १ हजार लेण्या या
बौद्ध लेण्या आहेत. महारा
ष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक लेण्या कोरल्याचे आढळते. त्यापैकीच एक लेणी सांगली जिल्ह्यात आढळते. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे गिरिलिंग म्हणून येथे लेणी ओळखली जाते. दक्षिण पूर्व दिशेला ही लेणी आहे. वज्रयान काळातील ही लेणी असल्यामुळे येथे कोरीव काम दिसून येत नाही.
ष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक लेण्या कोरल्याचे आढळते. त्यापैकीच एक लेणी सांगली जिल्ह्यात आढळते. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे गिरिलिंग म्हणून येथे लेणी ओळखली जाते. दक्षिण पूर्व दिशेला ही लेणी आहे. वज्रयान काळातील ही लेणी असल्यामुळे येथे कोरीव काम दिसून येत नाही.
पश्चिम महाराष्ट्रात एकेकाळी वज्रयान बुद्धिझमचे चांगल प्रस्त
होते. येथे मोठ्या प्रमाणावर वज्रयान बुद्धिझमचे अनुयायी होते. वज्रयान
बुद्धिझममध्ये स्तुपाचा आकार बदलून छोटा झालेला होता. कर्जत तालुक्यातील कोंडाणे लेणी
ही साधारण दुसऱ्या शतकामध्ये साकारलेली होती. यामध्ये स्तुपाची विभाजनी मेदी,
अण्ड, हर्मिका, छत्री अशा भागात आहे. तर सांगलीतील गिरिलिंग लेणी ही सातव्या
शतकामध्ये कोरली गेली असल्याचे त्याच्या वास्तुकलेवरून स्पष्ट होते. भारतात
सातव्या शतकामध्ये वज्रयान बुद्धिझमचा प्रभाव होता. त्यामुळे ही वज्रयान बुद्धिझमचे
प्रतिनिधित्व करणारी लेणी आहे. येथे
स्तुपाचा आकार तुलनेत छोटा आहे. याला वोटीव स्तुप असे म्हणतात. बहुतांशी अभ्यासक
वोटीव स्तुप हे शिवलिंग असल्याची गल्लत करतात, परंतु, ते तसे नाही. वज्रयान
बुद्धिझमचे हे एक प्रतिक आहे. दिसण्यास सामर्ध्य असले तरीही दोन्हीमधील
वास्तुरचनेतील तफावत हे सिद्ध करते की हे वोटीव स्तुप आहे. चीन, तिबेट, भुतान या
इस्ट एशियामध्ये वज्रयान बुद्धिझमला फॉलो करणारे अनुयायी आजही आहेत. वोटीव स्तुप
घारापूरी लेणीमध्येही आढळते. त्याचप्रमाणे छत्तीसगडच्या सिरपूरमध्ये झालेल्या उत्खनानातूनही
वोटीव स्तुप सापडले आहे. आज हे स्तुप छत्तीसगड पर्यटन विभागाने संरक्षित केले आहे.
परंतु, याला वोटीव स्तुप आहे, अशी मान्यता मात्र दिलेली नाही.
सांगलीतील ही लेणी वज्रयान
बुद्धिझमच्या काळातील आहे. दक्षिण
पूर्वच्या दिशेने ही लेणी आहे. येथे फ्लोअरवर भुसभुशीत माती आढळते. सर्वसाधारणपणे
लेण्याच्या फ्लोअरवर दगड सापडतो, पण येथे भुसभुशीत माती दिसून येते. फारस पद्धतीचा
दगड येथे आढळत असल्यामुळे येथे दगडाची झिज होऊन ही माती झाली असावी बहुतेक. या
लेणीमधील दगडाचीही प्रत तशी हलकीच आहे. तसेच लेणी बांधताना लाकडाचा वापर झाल्याचे
दिसून येते. दगडाची प्रत हलकी असल्यामुळे येथे अतिरिक्त कामे झाल्याचे दिसून येत नाही. कालांतराने या लेणीचा विकास मागे पडला असावा. या लेणीमध्ये एक ‘कोटक’ (विपस्सना
करण्यासाठीची छोटी खोली) दिसून येते. तर आणखी एक कोटक बांधण्याचा प्रयत्न झाल्याचे
दिसून येते. पण दगडाची प्रत चांगली न लागल्यामुळे दुसरे कोटक कोरण्यात आले नाही. सर्वसाधारणपणे
लेण्यांमध्ये पोदी आणि कोदी आढळतात. पोदी म्हणजे पिण्यासाठी पाणी साठवणूक करण्याची
जागा आणि कोदी म्हणजे वापरण्यास योग्य पाण्याची साठवणूक करण्याची जागा. येथे या
दोन्ही गोष्टी आढळत नाहीत. त्यामुळे येथे भिक्खुंचे चिरकाळ वास्तव्य राहिले असेल
की नाही, हे प्रश्नांकीत आहे. या लेणीमध्ये पिलास्टर देखील आहे. पिलास्टर म्हणजे
असा खांबा जो लेणीशी संलग्न असतो. अर्थात लेणीच्या अगदी जोडून असणाऱ्या खांबाला
पिलास्टर म्हणतात. प्रत्येक खांबाची रुंदी ही २.५ इंच असून कोटकची आहे. तर लेणीचा
आकारमान २०.७ फुट रुंदी आणि २७ फुट लांबी असा आहे. चेत्यगृहासमान हे बांधकाम असून
परंतु, याला चैत्यगृह म्हटले जात नाही. कारण येथे चैत्य किंवा मूर्ती दिसत नाही.
अशाच पद्धतीचे वास्तुशिल्प गुजरातमध्येही काही ठिकाणी आढहळे. या लेणीवरून
महाराष्ट्रात बौद्धधम्म चांगल्या प्रकारे वाढलेला, विस्तारलेला आणि विकसित
झाल्याचे समजून येते.

No comments:
Post a Comment