Thursday, 9 April 2020

buddha's ten precepts अर्थात दससील


§  पाणातिपाता : ज्याच्या श्वासाचा जीवितइंद्रियाशी संपर्क तुटला नाही, अशा जीवितइंद्रियांचा उपच्छेद करणे अर्थात त्यांना नष्ट करणे. वध करण्याच्या इरादा ठेऊन हत्या करणे म्हणजे पाणातिपाता होय.[1]  पाणातिपाता शील का तुटते? मनामध्ये द्वेषाची भावना असल्यामुळे पाणातिपाता सील तुटत असते. पाणातिपाता आदी सीलांचा भंग केल्यास मृत्यूनंतर निरयात गती होते.
§  अदिन्नदाना : जोपर्यंत दिले जात नाही, तोपर्यंत ग्रहण न करणे, मनामध्येही चोरीचा विचार न आणणे. जेव्हा मनामध्ये लोभ जागृत होतो, तेव्हा चोरीचे विचार येत असतात आणि या विचारांची कृतीत रुपांतर झाले तर अदिन्नदाना होते किंवा नुसता विचार जरी आला तरी देखील अदिन्नदाना होत असते. 
§  मुसावादा : खोटे बोलणे, विसंगत संवाद करणे. अर्थात जे सत्य आहे, त्याच्या विपरित कथन करणे. हेतुपुरस्सर काया आणि वाणीने विसंगत संवाद करणे. बोलताना मनामध्ये चुकीचे विचार असणे.
§  पिसुणावाचा : चुगली करणे होय. उदा, एखादा व्यक्ती भांडण लावण्याच्या उद्देशाने इकडून तिकडे सांगतो, तिकडचे इकडे सांगतो. एकमेकांमध्ये भांडणे लावतो. एकतामध्ये भेद पाडतो. भांडणाचा आनंद घेतो. कलहामध्ये ज्याला आनंद वाटतो, असे करणे म्हणजे पिसुणावाचा होय.
§  फरुसावाचा : कठोर बोलणे. असे काही शब्द जे कठोर आहेत, इतरांची मने दुखवणारी आहेत. क्रोधासमान आहेत. एकाग्रता भंग करणारे आहेत. अशी वाचा म्हणजे फरुसावाचा होय.
§  सम्फप्पलापा : अनावश्यक बोलणे, व्यर्थ बोलणे. असे काही बोलणे ज्यामध्ये तत्थ्य नाही. धम्महिन आहे. विनयाला धरून नाही.  
§  अब्रम्हचरिया : श्रेष्ठ चरिया (भोगविलास) न ठेवणे, दोघा-दोघांमध्ये मैथुन (लैंगिक संबंध) न करणे, मनानेही मैथुन न करणे. 
§  सुरामेरयमज्जपमादट्ठाना : सुरा म्हणजे नशायुक्त पेय होय. ‘पिट्ठसुरा, पूवसुरा, ओदनसुरा’[2] म्हणजेच धान्यापासून बनवलेले पेय, पूव म्हणजे एक प्रकारे भाकरी तसेच ओदान म्हणजे भात यापासून नशायुक्त बनवलेले पेय, ज्यामध्ये फुलांचा, फळांचा, गुळाचा, मधाचा आस्वाद आहे, असे पेय ग्रहण केल्याने प्रमाद वाढतो, चित्त मदमस्त होते. शुद्धीत राहत नाही. जे प्रमादाचे स्थान आहे, अशा पेयाचे अथवा पदार्थांचे सेवन करणे म्हणजे सुरामेरयमज्जपमादट्ठाणा होय.
§  विकालभोजन :विकालभोजनन्ति मज्झन्हिकवीतिक्कमे भोजनं’[3] अर्थात दिवसाच्या मध्य काळानंतर भोजन ग्रहण करणे. सर्वसाधारणपणे सकाळी ६ वाजता सूर्योदय होतो, त्यानुसार दिवसाचा मध्यकाळ म्हणजे दुपारचे १२ वाजणे. १२ वाजल्यानंतर भोजन ग्रहण करणे म्हणजे विकालभोजन होय.
§  नच्चगीतवादितविसूकदस्सन : नाच, गाणी, वादन आणि विसूकदस्सन म्हणजे क्लेशाच्या उत्पत्तीचे कारण बनणे आणि कुशलाच्या जे बाजूने आहे, त्याचे भेदन करणे होय.
§  माला-गन्ध-विलेपन-धारण-मण्डन-विभूसनट्ठाना : माला म्हणजे पुलांची माळ, गंध म्हणजे सुगंधीत अत्तर, विलेपन म्हणजे आकर्षित वाटण्यासाठी लावणारे लेपण, सुंदर दिसण्यासाठी केलेला प्रयत्न; याला धारण करून विभूषित होणे अर्थात मेकअप करणे.
§  उच्चासयना-महासयना : प्रमाणापेक्षा जास्त उंच आसन, मोठे आसन.
§  जातरूप-रजतपटिग्गहणा : सोने-चांदी, पैसे (तांब्याचे नाणे, अग्नी पेटेल असे लाकूड किंवा अग्नी पेटवण्यासाठीचे लाकूड, विकण्यासोग्य वस्तु, किरकोळ नाणी) आदी बाळगणे, त्याचे ग्रहण करणे होय.


[1] खुद्दकनिकाय, खुद्दकपाठ अट्ठकथा, सिक्खापदवण्णना, सिक्खापदपाठमातिका, पुरिमपञ्चसिक्खापदवण्णना
[2] खुद्दकनिकाय, खुद्दकपाठ अट्ठकथा, सिक्खापदवण्णना, सिक्खापदपाठमातिका, पुरिमपञ्चसिक्खापदवण्णना
[3] खुद्दकनिकाय, खुद्दकपाठ अट्ठकथा, सिक्खापदवण्णना, सिक्खापदपाठमातिका, पुरिमपञ्चसिक्खापदवण्णना

No comments:

Post a Comment