रेन वॉटर हार्वेस्टिंग अर्थात पावसाळी पाण्याची साठवणूक करणे, ही फार पूर्वीपासून चालत आलेली संकल्पना. कचऱ्याचे रुपांतर खतामध्ये करण, हे देखील आपल्यासाठी काही नवीन नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आपल्याकडे रुढ झालेल्या संकल्पना आता मात्र विस्मरणात गेल्या आहेत. परिणामी आज ग्लोबल वॉर्मिंगसारखा प्रश्न समोर आला आहे. अवकाळी पाऊस, गारपीठ, दुष्काळ, ओला दुष्काळ असे पर्यावरणाची संबंधित प्रश्नांवर आपली ऊर्जा खर्ची होत आहे. तसे या परिस्िथतीलाही आपणच कारणीभूत आहोत, हे देखील मान्य करावे लागले. ही परिस्थिती भयावह होऊ नये, यासाठी आतापासूनच उपाययोजना आखण्याची नितांत गरज आहे. शहरी भागात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ही काळाची गरज बनली असून ग्रामीण भागात जल संधारण काळाची गरज बनली आहे.
विविध समाजिक संस्थांमार्फत रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती सुरु आहे. ठाण्यात सुमारे १ हजार हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांनी पावसाळी पाण्याची साठवणूक करण्याची यंत्रणा उभारली आहे. हे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या रक्षणाकडे पडलेले एक इवलेसे पाऊलच म्हणावे.
निसर्गाशी आपले असलेले नाते म्हणजे पर्यावरण होय. माणसाने खूप प्रगती केली. आपण अंतराळापर्यंत पोहचलो आहोत. परंतु, काही मुलभूत गोष्टी अशाही आहेत (हवा, पाणी) ज्यांची आपण निर्मिती नाही करु शकत. त्या निसर्गातूनच मिळवाव्या लागतात. शहरी भागात मुख्यत्वे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासते. त्यामुळे पर्यायी साधनांतून पाण्याची बचत कशी करता येईल, याकडे ठाण्यातील पर्यावरण जनजागृती मंचने लक्ष वेधले. त्यातूनच रेन वॉटर हार्वेस्टिंगची कल्पना पुढे आली. २००३ पासून पावसाळी पाण्याची साठवणूक करण्याच्या विषयाची जनजागृती सुरु झाली आणि अवघ्या तीन वर्षांत मंचच्या या कामाची युनिस्कोने सुद्धा दखल घेतली. त्यामुळे आजमतीस ठाण्यात बहुतांशी सोसायट्यांनी पाण्याची साठवणूक करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. परंतु, पर्यावरणाबाबत दक्ष असणे म्हणजे पाण्याची साठवणूक करणे, एवढेच नसते. हा तर केवळ एक भाग झाला.
आज पर्यावरणासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कचऱ्याचा! मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये डम्पिंग ग्राऊंड हा कळीचा मुद्दा झाला आहे आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न देखील सुरु आहेत. पंरतु, कचऱ्याने काय आताच जन्म घेतला आहे का? पूर्वीही कचरा होताच ना! मग त्याची विल्हेवाट कशी लागत असावी? पूर्वी खेड्यांमध्ये ‘उकीरडा’ नावाचा प्रकार होता. त्यात ग्रामस्थ कचरा टाकत असत आणि कालांतराने त्याचा वापर शेतीसाठी खत म्हणून व्हायचा. अगदी पारंपारकी पद्धतीने बनलेल्या या कचऱ्यामुळे जमिनीचा कसही अबाधित राहायचा. परंतु, आज ‘युरिया’ने जमिनीची प्रतही खलावली आिण उत्पन्नही कमी झाल्याचे दिसून येते. ज्या कारणासाठी उकीरडा ओळखला जात होता, ती संकल्पनाच आज लोप पावली आहे. एकेकाळी जे आपल्या अंगवळणी होते, ते सांगण्यासाठी आज सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुरडा करावा लागत आहे. ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणावर आज कोट्यवधी खर्च होत आहेत. ही प्रगती म्हणावी की अधोगती? निसर्गाशी मानवाचे असलेले नाते म्हणजे पर्यावरण. परंतु, आपण निसर्गापासून दूर लोटलो आहोत. मग पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही तर काय होणार. परिणामी आज निसर्गाचे चक्रही बदललेले दिसते. असह्य उकाडा हे त्याचेच प्रतिक आहे. अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ ही त्याचीच फळे आहेत. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आपल्याला त्याच्या जवळ जावे लागेल. कार्बनडाय ऑक्साईडचे वाढते प्रमाण मानव जातीसाठी धोकादायक आहे. या कार्बनचे स्थितीकरण करण्याची गरज आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या हे अवाक्याबाहेर असले तरी जितकी जास्त झाडे असतील तितका कार्बन नियंत्रणात राहिल, हे समजायला कोणत्या रॉकेट सायन्सची गरज लागत नाही. हो पण त्यासाठी शाळा मात्र हवी, हे मान्य. आज शाळांमध्येही पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी भिंतीचित्रांच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे. ठाण्यात तर पर्यावरण शाळा देखील आहे. ही एकप्रकारची अचिव्हमेंट म्हणावी. जो झोपलेला आहे, त्याला उठवता येऊ शकते, मात्र ज्याने झोपेचे सांेग घेतले आहे, त्याला उठवता येत नाही, अशी एक म्हण आहे आणि पर्यावरणाच्या बाबतीत तर सर्वांनी झोपेचे साेंगच घेतले आहे. त्यांना उठविण्यासाठी मोठ्या धक्क्याची गरज आहे. केवळ जनजागृतीने ही लोकं उठणारी नाहीत. आपण किती पाण्यात आहोत, हे समजावून सांगण्यासाठी, आपल्याला किती धोका आहे, याची जाणीव करुन देण्यासाठी ‘पर्यावरण शाळां’ची आज चौकाचौकांत गरज आहे.

सुंदर लेख
ReplyDelete